Ind vs Eng : रोहितच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी

मुंबई तक

• 05:13 PM • 04 Sep 2021

ओव्हल कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावातील खराब कामगिरीला मागे टाकत भारताने कसोटी सामन्यावर पकड मजबूत बसवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाअखेरीस १७१ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ विकेटच्या बदल्यात २७० […]

Mumbaitak
follow google news

ओव्हल कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावातील खराब कामगिरीला मागे टाकत भारताने कसोटी सामन्यावर पकड मजबूत बसवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाअखेरीस १७१ धावांची आघाडी घेतली.

हे वाचलं का?

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने ३ विकेटच्या बदल्यात २७० रन्सपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विराट कोहली २२ तर रविंद्र जाडेजा ९ धावांवर अजुनही खेळत आहेत.

दुसऱ्या दिवशी आश्वासक सुरुवात केल्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी मोठ्या खुबीने भारताचं पारडं जड ठेवलं. रोहितने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी झाल्यानंतर जेम्स अँडरसनने लोकेश राहुलला आऊट केलं. राहुलने ४६ रन्स केल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. संपूर्ण मालिकात कामगिरीत सातत्य नसल्यामुळे चर्चेत असलेल्या पुजारानेही रोहितला उत्तम साथ दिली.

Ind vs Eng : ओव्हलच्या मैदानावर Rohit Sharma चमकला, परदेशात पहिलं कसोटी शतक

रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने यानंतर दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली. मैदानात जम बसलव्यानंतर दोन्ही फलंदाजांनी आपल्या ठेवणीतले सुरेख फटके खेळले. ही जोडी फोडण्यासाठी जो रुटने भरपूर प्रयत्न केले, पण त्याला यात यश येत नव्हतं. यादरम्यान रोहितने परदेशात आपलं पहिलं शतक साजरं केलं. मोईन अलीच्या बॉलवर पुजाराने पुढे येऊन षटकार ठोकला आणि शतकाला गवसणी घातली. ही जोडी इंग्लंडच्या नाकीनऊ आणणार असं वाटत असतानाच इंग्लंडला यश मिळालं.

रॉबिन्सनच्या बॉलिंगवर पूलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वोक्सकडे कॅच देऊन आऊट झाला. त्याने २५६ बॉलमध्ये १४ फोर आणि १ सिक्स लगावत १२७ रन्स केल्या. त्याआधी पुजारानेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू रोहित आऊट झाल्यानंतर तो देखील रॉबिन्सनच्या बॉलिंगवर मोईन अलीकडे कॅच देऊन आऊट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने उरलेली षटकं खेळून काढत भारताची पडझड थांबवली. यानंतर अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला. त्यामुळे भारत आता चौथ्या दिवशी आपली आघाडी किती धावांनी वाढवतो आणि इंग्लंडला विजयासाठी किती धावांचं आव्हान देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Ind vs Eng : सुरक्षा कवच भेदून मैदानात शिरणाऱ्या Jarvo ला लंडनमध्ये अटक

    follow whatsapp