IND vs NZ 1st Test Day 2 Scorecard LIVE: पटापटा कसा झटापटा... टीम इंडियाचा टप्प्यातच कार्यक्रम, 46 धावांत सगळे बाद

मुंबई तक

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 07:21 PM)

IND vs NZ 1st Test, Day 2 Scorecard: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाची पहिल्या डावात अक्षरश: भंबेरी उडाली आहे.

 न्यूझीलंडसमोर लोटांगण.. 5  भारतीय खेळाडू शून्यावर बाद!

न्यूझीलंडसमोर लोटांगण.. 5 भारतीय खेळाडू शून्यावर बाद!

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारत वि. न्यूझीलंड पहिली कसोटी बंगळुरूत

point

भारतीय संघाने किवींसमोर टाकली नांगी

point

भारतीय संघाचे पाच फलंदाज शून्यावर बाद

IND vs NZ 1st Test: बंगळुरू: भारत आणि न्यूझीलंडच्या तीन टेस्ट मॅचच्या मालिकेचा पहिला सामना 16 ऑक्टोबरला बंगळुरूत सुरू झाला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू झालेला हा सामन्यात पहिल्याच दिवशी पावसामुळे अडथळा आला. त्यानंतर आज सामन्याचा दुसारा दिवशी हा सामना पुन्हा सुरू झाला. 3 सामन्यांच्या या मालिकेचा आज दुसरा दिवस होता. या सामन्यात टीम इंडियाने फक्त 46 धावांवर आपले सगले गडी गमावले. हा भारतीय संघाचा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे. तसंच भारताच्या मैदानावर एखाद्या संघाचा एवढा कमी स्कोअर असण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.  (ind vs nz 1st test day 2 scorecard live updates from m chinnaswamy stadium bengaluru )

हे वाचलं का?

टीम इंडियाची अवस्था बिकट

भारतीय संघाचे तब्बल 5 फलंदाच 0 धावांवर बाद झाले. तर दुसरीकडे 5 गडी बाद करत न्यूझीलंडच्या मॅट हेनरीने गोलंदाजीतून सामना पलटवला. न्यूझीलंडच्या संघाला भारताच्या मैदानावर आतापर्यंत कुठलाच द्विपक्षीय सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी भारत आणि न्यूझीलंडमध्ये 13 वी मालिका पार पडतेय. यावेळी भारताच्या संघाची जबाबदारी रोहित शर्मा तर किवींच्या संघाची धुरा टॉम लैथमवर आहे.

हे ही वाचा >> IND vs NZ : "फक्त त्याच खेळाडूंना..."; भारताच्या प्लेईंग XI बाबत कोच गौतम गंभीर 'हे' काय बोलून गेला

दरम्यान, या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदलही करण्यात आले होते. सरफराज खानने जखमी असलेल्या शुभमन गिलच्या जागा घेतली. कुलदीपला आकाश दीपच्या जागेवर  तिसरा स्पिनरम्हणून मैदानात उतरवलं गेलं.

न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, यानंतर 24 ऑक्टोबरला दुसरा सामना पुण्यात आणि 1 नोव्हेंबरला तिसरा सामना मुंबईत पार पडणार आहे. 

हे ही वाचा >> IND vs BAN: भारताचा हुकमी एक्काच! रोहित शर्माचा मोठा कारनामा, विराट कोहलीचा विक्रम मोडला

एकूणच आजच्या सामन्यातील भारताच्या खेळामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये काहीशी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता यापुढील सामन्यांमध्ये टीम इंडियावर अपेक्षांचं ओझं असणार आहे.
 

भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी भारतीय संघात कोण-कोण?

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज हे खेळाडू मैदानात आहेत.

न्यूझीलंडच्या संघात कोण-कोण?

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिशेल, टॉम ब्लंडेल ( विकेट कीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओरुर्के या खेळाडूंचा न्यूझीलंड संघात समावेश आहे.

न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, यानंतर 24 ऑक्टोबरला दुसरा सामना पुण्यात आणि 1 नोव्हेंबरला तिसरा सामना मुंबईत पार पडणार आहे. एकुणच आजच्या सामन्यातील भारताच्या खेळामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये काहीशी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता यापुढील सामन्यांमध्ये टीम इंडियावर अपेक्षांचं ओझं असणार आहे.

    follow whatsapp