Ladki Bahin Yojana : महिलांना किती तारखेला मिळणार 5500 चा दिवाळी बोनस?

मुंबई तक

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 02:28 PM)

Ladki Bahin Yojana :काही महिलांना सरकारकडून दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती.

ladki bahin yojana scheme only these women get benefit of  diwali bonus of Rs 5500 in their account

महिलांना 2500 रूपये दिवाळी बोनस जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार?

point

महिलांना बोनस स्वरूपात किती पैसे मिळणार?

point

तुमच्या खात्यात किती पैसे येणार?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होतात. अशाप्रकारे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत 7500 रूपये जमा झाले आहेत. या 7500 मध्ये सरकारने महिलांना 3000 रूपयांचा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे भाऊबीजेच्या रूपात दिला होता.त्यानंतर सरकारने महिलांना 2500 रूपये दिवाळी बोनस जाहीर केला आहे. हा दिवाळी बोनस नेमका महिलांना किती तारखेला मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme only these women get benefit of 
diwali bonus of Rs 5500 in their account)

हे वाचलं का?

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले होते.त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली होती. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'दिवाळी बोनस'साठी 'या' महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात?

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा बोनस जमा करण्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या होत्या. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बसणार आहे. 

'या' महिलांना मिळणार दिवाळी बोनस? 

 ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत आहे. ज्या महिलांनी योजनेतून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला आहे. ज्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम आणि अटींचं पालन केले आहे, अशा महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे. ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी गोड होणार, कुणाच्या खात्यात 5500 रूपयांचा बोनस येणार?

पण हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे. याची माहिती मिळू शकली नाही. सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात नेमका दिवाळी बोनस कधी येणार? हा मोठा प्रश्न आहे. 

    follow whatsapp