इंग्लंडविरुद्ध भारतीय कसोटी संघाचा दौरा अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय संघाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. टीम इंडियाचा ओपनर मयांक अग्रवाल पहिल्या टेस्ट मॅचमधून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान मोहम्मद सिराजचा बॉल मयांक अग्रवालच्या हेल्मेटला लागला.
ADVERTISEMENT
बॉल हेल्मेटला बसल्यानंतर मयांक अग्रवालला concussion ची लक्षणं दिसायला लागल्यानंतर फिजीओ आणि मेडीकल टीमने त्याच्यावर तात्काळ उपचाराला सुरुवात केली आहे. मयांकची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून तो पहिल्या टेस्टसाठी उपलब्ध नसेल असं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. भारतीय संघाला याआधीच दुखापतींनी ग्रासलेलं आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तीन खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत.
यांच्याजागेवर बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं आहे. त्यातच मयांक अग्रवालला झालेल्या दुखापतीमुळे आता भारतासमोर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीचा पर्याय उपलब्ध आहे. बुधवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ अंतिम ११ जणांच्या संघात कोणाला स्थान देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT