लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, विराट कोहली यांनी डाव सावरत पडझड रोखली. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागेल, असं वाटत असतानाच चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली. चेतेश्वर पुजारा विराटनंतर आलेल्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतलं. या विजयाबरोबर इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
ADVERTISEMENT
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडने दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारता पूर्ण डाव ७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही आक्रमक मारा केला. इंग्लडच्या माऱ्यासमोर चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, विराट कोहली वगळता इतर फलंदाजांनी इंग्लडच्या गोलंदाजांसमोर हाराकिरी पत्करल्याचं दिसलं.
सुरुवातीच्या दोन दिवसांवर इंग्लंडच्या संघानं वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी कामगिरी उंचावत सामन्यातील रंगत टिकवून ठेवली होती. मात्र, चौथ्या दिवशी डावाच्या सुरूवातीलाच चेतेश्वर पुजारा (९१) तंबूत परल्यानंतर फलंदाजी ढेपाळली. कर्णधार विराट कोहली (५५) नंतर अंजिक्य रहाणे आणि ऋषभ पंत फार काळ खेळपट्टी तग धरू शकले नाही.
चौथ्या दिवशी मैदानावर काय झालं?
तिसऱ्या दिवशी भारताने दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत वाढवली होती. चौथ्या दिवशी ऑली रॉबिन्सन भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला बाद केलं. रॉबिन्सनने पुजाराला पायचित केलं. पंचांनी अपील फेटाळल्यानंतर इंग्लडने डीआरएस घेतला आणि भारताला मोठा धक्का बसला.
एकाही धावेची भर न घालताच पुजारा माघारी परतला. पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं. पण त्यालाही जम बसवता आला नाही. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ५५ धावांवर खेळत असताना रॉबिन्सननेच कर्णधार रुटकरवी कोहलीला झेल बाद केलं.
कोहलीने तंबूत परतल्यानंतर अजिंक्य रहाणे (१०) आणि रिषभ पंतही (१) झटपट बाद झाले. शेवटचे भरवशाचे फलंदाज बाद झाल्यानं सामना गमावल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. त्यानंतर तळातील फलंदाजही करिश्मा दाखवू शकले नाही. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून वेगवान गोलंदज ऑली रॉबिन्सनने भेदक मारा केला. तिसरा कसोटी सामना इंग्लडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला.
ADVERTISEMENT