ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर दीपर चाहर हा काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांचा लग्न सोहळा 1 जून रोजी पार पडला.
दरम्यान, याच लग्नसोहळ्यातील रिसेप्शनमधील एका फोटो पाहून चाहत्यांना असं वाटलं की, यामध्ये पाकिस्तानी प्लेअर देखील सहभागी झाला आहे.
राजस्थानचा प्लेअर मुकेश खत्री हा पाकिस्तानचा हसन अली आहे असंच अनेक जणांना फोटो पाहून वाटलं होतं.
ट्विटरवर अनेक जण सुरुवातीला अशी चर्चा करत होते की, दीपकने हसन अलीला देखील बोलावले आहे.
या फोटोमुळे सुरुवातीला अनेक जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
दीपक चाहरने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनला कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला बोलावलं नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
सध्या दीपक चाहरच्या लग्नातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT