Indian Hockey Team, Paris Olympics: भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांने रचला इतिहास, असं घडलं तरी काय?

मुंबई तक

• 07:52 PM • 08 Aug 2024

Hockey team won Bronze: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. यासह भारताने तब्बल 52 वर्षानंतर एक मोठा इतिहास रचला आहे.

भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांने रचला इतिहास

भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांने रचला इतिहास

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

point

सलग दुसऱ्यांदा मिळवलं हॉकीमध्ये कांस्य पदक

point

ब्रॉंझ मेडल सामन्यात स्पेनवर भारताची 2-1 ने मात

Indian Hockey Team won Bronze, Paris Olympics 2024: पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांनी स्पेनचा 2-1 असा पराभव केला. हॉकीमधील भारताचे हे चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय ऑलिम्पिकच्या इतिहासात हॉकीमध्ये भारताने सर्वाधिक 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. यासह भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. (indian hockey team paris olympics medals in 2 consecutive Olympics indian hockey team repeated 52 year old history bronze medal match india vs spain )

हे वाचलं का?

वास्तविक, भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदके जिंकली आहेत. यापूर्वी 1960 ते 1972 पर्यंत भारताने हॉकीमध्ये सलग 4 पदके जिंकली होती. त्यानंतर 1976 च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला एकही पदक मिळाले नाही. यानंतर 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हे ही वाचा>> "गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, कारण...", माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

तब्बल 40 वर्षानंतर भारताने पॅटर्नच बदलला!

1980 पासून भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रयत्नशील होता. त्यानंतर तब्बल 40 वर्षांनंतर पदकाचा हा दुष्काळ संपला आणि भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकून तब्बल 52 वर्षांनंतर सलग दोनदा पदक जिंकण्याचा इतिहास रचला आहे. 1972 नंतर भारताने हॉकीमध्ये सलग 2 पदके जिंकली आहेत. 1968 आणि 1972 मध्येही भारताने सलग दोन कांस्यपदके जिंकली होती.

हे ही वाचा>> Paris Olympic 2024 : भारताने रचला इतिहास, हॉकीमध्ये कांस्यपदक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आजपर्यंत (8 ऑगस्ट) एकूण 4 पदके जिंकली आहेत. ही चारही ब्राँझ पदकं आहेत. मागील तीन कांस्यपदके नेमबाजीत जिंकली आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरने मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. जिच्यासोबत सरबज्योत सिंगही संघात होता. तर तिसरं पदक हे महाराष्ट्राच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत जिंकलं होतं. आता भारतीय हॉकी संघाने चौथे कांस्य पदक जिंकलं आहे.

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात एकूण 13 पदकं जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत विक्रमी 8 सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत.

    follow whatsapp