IPL च्या चौदाव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात निवड झालेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर संघाबाहेर पडला आहे. बुधवारी झालेल्या दुखापतीमुळे अर्जुन उर्वरित हंगामात खेळू शकणार नाहीये. त्यामुळे अर्जुनच्या जागेवर संघात सिमरजीत सिंगची निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
डावखुरा फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकरवर मुंबईने या वर्षाच्या सुरुवातीला २० लाखांची बोली लावली होती. अर्जुन तेंडुलकरच्या जागी टीममध्ये आलेल्या सिमरजीत सिंगने नियमानुसार असलेला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली आहे.
अर्जुन तेंडुलकरला अजूनही आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नव्हती. या मोसमात तो नेट बॉलर म्हणूनच टीमच्या बॅट्समनना सराव देत होता.
IPL 2021 च्या वेळापत्रकात महत्वाचा बदल, ‘या’ दिवशी दोन नव्या संघांची नावं होणार घोषित
कोण आहे सिमरजीत सिंग? जाणून घ्या…
सिमरजीत सिंग हा नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. सिमरजीतने 15 टी-20 सामन्यांमध्ये 20.50 ची सरासरी आणि 7.76 च्या इकोनॉमी रेटने 18 विकेट घेतल्या आहेत. 2020-21 च्या विजय हजारे ट्रॉफी (50 ओव्हर) मध्ये सिमरजीत सिंग दिल्लीचा सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता. या स्पर्धेत त्याने 5.65 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट घेतल्या होत्या.
IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्सला किती संधी?
ADVERTISEMENT