आयपीएलच्या हंगामातला सुरुवातीचा सामना हरण्याची मुंबई इंडियन्सची परंपरा या हंगामातही कायम राहिली आहे. सलग दोन वर्ष विजेतेपद मिळवलेल्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२१ च्या सुरुवातीच्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१३ साली रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने शेवटचा हंगामातला पहिला सामना जिंकला होता. RCB ने २ विकेट राखत मुंबईला पराभूत करत चौदाव्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. एबी डिव्हीलियर्सने केलेली फटकेबाजी RCB साठी निर्णायक ठरली.
ADVERTISEMENT
१६० रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना RCB ने चांगली सुरुवात केली. ओपनिंगला येणारा वॉशिंग्टन सुंदर आणि विराट कोहलीने ३६ रन्सची पार्टनरशीप केली. मुंबईला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याची संधी होती, परंतू रोहितने सुंदरचा कॅच सोडला. ही जोडी मैदानावर जमतेय असं वाटत असतानाच कृणाल पांड्याने वॉशिंग्टन सुंदरला आऊट केलं. याच्यानंतर डेब्यू करणारा रजत पाटीदारही फारशी चमदक दाखवू शकला नाही. ट्रेंट बोल्टने त्याला ८ रन्सवर क्लिन बोल्ड केलं.
IPL 2021 : मुंबईच्या इनिंगला खिंडार, ५ विकेट घेत हर्षल पटेल चमकला
यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने पार्टनरशीप करत RCB च्या डावाला आकार दिला. दोघांनीही मैदानात तळ ठोकत अनावश्यक फटकेबाजी न करता तिसऱ्या विकेटसाठी ५२ रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी RCB ला विजयाच्या जवळ घेऊन जातेय असं वाटत असतानाच, रोहितने बॉलिंगमध्ये केलेले बदल कामी आहे. बुमराहने विराटला आऊट करत जमलेली जोडी फोडली. ३३ रन्स काढून विराट आऊट झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलही फाईन लेगच्या दिशेने शॉट खेळण्याच्या प्रयत्नात ख्रिल लिनकडे कॅच देऊन आऊट झाला. त्याने २८ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्स लगावत ३९ रन्स केले.
मोक्याच्या क्षणी मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी चांगल्या पद्धतीने कमबॅक करत RCB ला दडपणाखाली आणलं. दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने फटकेबाजीला सुरुवात करत मॅचमध्ये रंगत आणली. परंतू बुमराहने पुन्हा एकदा डॅनिअल ख्रिश्चनला आऊट करत RCB ला आणखी एक धक्का दिला. परंतू दुसऱ्या बाजूने मैदानावर तळ ठोकून राहिलेल्या एबी डिव्हीलियर्सने मुंबईच्या बॉलर्सना यश मिळू दिलं नाही. बोल्ट-बुमराह यांच्या बॉलिंगवर हल्लाबोल करत डिव्हीलियर्सने RCB चं आव्हान कायम राखलं. मोक्याच्या क्षणी जेमिन्सन आणि डिव्हीलियर्स आऊट रनआऊट झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती. परंतू तळातल्या बॅट्समननी आवश्यक त्या रन्स पूर्ण करत RCB च्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्स अखेरीस ९ विकेट गमावत १५९ पर्यंत मजल मारली. ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने इथपर्यंत मजल मारली. चांगल्या सुरुवातीनंतर RCB च्या बॉलर्सनी अखेरच्या स्पेलमध्ये भेदक मारा करत मुंबईच्या स्कोअर लाईनला अंकुश लावला.
टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय RCB ने घेतला. रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत सुरुवात केली. परंतू चहलच्या बॉलिंगवर चोरटी रन घेण्याच्या प्रयत्न रोहित रनआऊट झाला. यानंतर लिनने सूर्यकुमार यादवच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप केली. यावेळी दोन्ही बॅट्समननी RCB च्या स्पिनर्सवर चांगलाच हल्लाबोल केला. जेमिन्सनने सूर्यकुमार यादवला आऊट करत मुंबईची जोडी फोडली आणि मुंबईच्या धावगतीला अंकुश बसवला.
यानंतर ख्रिस लिनने फटकेबाजीचा प्रयत्न केला खरा, इशान किशनसोबत त्याने छोटेखानी पार्टनरशीपही केली. परंतू विराट कोहलीने १२ व्या ओव्हरमध्ये बॉलिंगमध्ये बदल करत वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आणि त्याने लिनला ४९ रन्सवर आऊट केलं. लिनने ३५ बॉलमध्ये ४ फोर आणि ३ सिक्सच्या मदतीने ४९ रन्स केल्या. यानंतर ठराविक अंतराने मुंबईचे बॅट्समन आऊट होत राहिले. अखेरीस २० व्या ओव्हरअखेरीस मुंबई इंडियन्सचा संघ १५९ पर्यंत मजल मारु शकला. RCB कडून हर्षल पटेलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
ADVERTISEMENT