कोरोनामुळे लांबलेल्या आयपीएलमध्ये अखेर चेन्नई सुपर किंग्सने थाटात प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या चेन्नईने हैदराबादचं १३४ धावांचं आव्हान ६ गडी राखून गाठलं. महत्त्वाचं म्हणजे महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ADVERTISEMENT
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या चेन्नईने प्लेऑफमधील आपलं स्थान गुरूवारी निश्चित केलं. चेन्नईच्या संघाने या सामन्यात सनरायझर्ह हैदाराबादवर मात केली.
चेन्नईविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात हैदराबादला प्ले-ऑफमध्ये पोहण्याची अखेरची संधी होती. मात्र, चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजीला रोखून धरलं. त्यामुळे हैदराबादसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या सामन्यात हैदराबादला १३४ धावाच करता आल्या.
IPL 2021 च्या वेळापत्रकात महत्वाचा बदल, ‘या’ दिवशी दोन नव्या संघांची नावं होणार घोषित
हैदराबादनं दिलेलं १३४ धावांचं आव्हान चेन्नईचा संघ सहज गाठेल असं सामना सुरू होण्यापूर्वी वाटत होतं. मात्र, सलामीवीर सोडता इतर फलंदाज झटपट बाद झाल्यानं हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगत गेला. मात्र, धोनीने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सामन्याचा समारोप केला. चेन्नईला विजयासाठी दोन धावांची गरज असताना धोनीने अखेर षटकार खेचत सामना चेन्नईच्या नावे केला.
असा रंगला सामना
हैदराबादच्या संघानं दिलेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी धडाकी सुरुवात करून दिली. फॅफ आणि ऋुतुराज यांनी ७५ धावांची दमदार सलामी दिली. ऋतुराजने ४५ धावांची (चार चौकार आणि दोन षटकार) खेळी साकारली.
मात्र, ऋतुराज गायकवाड बाद झाल्यावर चेन्नईच्या संघाला ठराविक फरकाने एकामागून एक धक्के बसत गेले. ऋतुराजनंतर मोइन अली, सुरेश रैना आणि त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस (४१) बाद झाले आणि चेन्नईचा संघ अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं. पण त्याचवेळी धोनी आणि अंबाती रायुडू यांनी जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
ADVERTISEMENT