टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. ऑक्टोबर महिन्यात पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कर्णधारपदावरुन पायउतार होणार असून तो फक्त वन-डे आणि कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. विश्वचषक संपल्यानंतर विराट टी-२० क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून उपलब्ध असणार आहे.
ADVERTISEMENT
विराटच्या या निर्णयावर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे. “टीम इंडियासाठी आम्ही भविष्याचा विचार करुन ठेवला आहे. प्रत्येक खेळाडूवर येणारा ताण लक्षात घेता जबाबदारीचं योग्य वेळेत दुसऱ्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे. यासाठीचं विराटने टीम इंडियाच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मी विराटशी यासंबंधात चर्चा करतो आहे. भविष्यात विराट भारतीय संघाचा एक सिनीअर खेळाडू म्हणून त्याचं योगदान देत राहील.”
Big News : Virat Kohli T20 चं कर्णधारपद सोडणार
सध्या सर्व भारतीय खेळाडू आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी युएईत दाखल झाले आहेत. यानंतर ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून १४ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
ADVERTISEMENT