2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक आले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अमृतसरच्या लवप्रीत सिंगने (Lovepreet Singh) 109 किलो वजनी गटात हे पदक जिंकले आहे. लवप्रीत सिंग सामन्यादरम्यान क्रमवारीत अव्वल होता आणि सर्वांना वाटले होते की सुवर्णपदक निश्चित होईल, पण शेवटी असे काही घडले की तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला.
ADVERTISEMENT
लवप्रीतचे सर्व प्रयत्न यशस्वी, पण…
109 किलो वजनी गटात लवप्रीत सिंगने आपले सर्व 6 प्रयत्न यशस्वी केले. सर्व फेऱ्यांमध्ये तो यशस्वी झाल्या हे फार कमी जणांना जमते. त्याने स्नॅच फेरीत 157 किलो, 161 किलो, 163 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 185 किलो, 189 किलो, आणि 192 किलो वजन उचलले. लवप्रीत सिंगने एकूण 355 कि.ग्रॅ. वजन उचलले आणि स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला.
टॉपवर राहूनही गमावले सुवर्णपदक
लवप्रीत सिंगने आपली फेरी पूर्ण केली तेव्हा तो अव्वल होता. पण त्यानंतर कॅमेरोनियन वेटलिफ्टरने त्याच्या फेरीत 160+201 किलो वजन उचलले आणि तो सरळ शीर्षस्थानी पोहोचला, त्याच्याशिवाय सामुआच्या वेटलिफ्टरने 164+194 किलो वजन उचलले.
Commonwealth Games 2022: बॉक्सिंगमध्ये भारताची सहा पदकं निश्चित, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास
या सामन्यात सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूने 361 किलो तर रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूने 358 किलो आणि कांस्य जिंकणाऱ्या लवप्रीत सिंगने 355 किलो वजन उचलले. लवप्रीत 6 किलोने मागे पडला.
लवप्रीत सिंग रणनीतीमध्ये अपयशी ठरला का?
लवप्रीत सिंगने इतर वेटलिफ्टर्सपेक्षा कमी वजन बदलले. कारण इतर खेळाडूंनी पदकानुसार आपले लक्ष्य वारंवार बदलल्याचे दिसून आले. यामध्ये समुआच्या खेळाडूने क्लीन अँड जर्क फेरीच्या दुसऱ्या प्रयत्नात वजन 200 किलोपर्यंत वाढवले. मात्र त्याला यश आले नाही आणि त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात वजन 201 किलोपर्यंत वाढवण्यात आले.
त्याचप्रमाणे क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने 192 किलो वजनावरुन थेट 202 किलो वजन वाढवले. ज्यामध्ये तो यशस्वी झाला. आणि शेवटच्या प्रयत्नात त्याचे लक्ष्य होते 211 किलो पर्यंत, ज्यामध्ये तो अयशस्वी झाला. कारण तो खूप मागे होता आणि कांस्यपदकानुसार वजन वाढवत होता.
CWG 2022, Lawn Bowls : हवालदार, क्रीडा शिक्षक अन् क्रीडा अधिकारी; सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या चौघी कोण?
अशा परिस्थितीत लवप्रीत सिंगच्या रणनीतीत चूक झाली का, असा प्रश्न पडतो, कारण त्याने येथे ज्या पद्धतीने खेळ दाखवला आणि सर्व प्रयत्न यशस्वी केले. अशा स्थितीत या लयीत आल्यानंतर तो आपल्या वजनात काही बदल करू शकतो, पण तसे झाले नाही. यामुळेच सलग 6 यशस्वी प्रयत्नांनंतरही त्याला कांस्यपदकापर्यंत मजल मारता आली.
ADVERTISEMENT