आधी हार्दिक पांड्याला घाम फोडला नंतर चेन्नईचा विजय हिसकावला, जाणून घ्या आयुष बदोनीबद्दल

मुंबई तक

• 11:35 AM • 01 Apr 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजाएंट संघाने गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नईने विजयासाठी दिलेलं द्विशतकी धावसंख्येचं आव्हान लखनऊने एविन लुईस आणि आयुष बदोनी या दोन खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. गुजरातविरुद्ध पहिल्या सामन्यात लखनऊच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतू या दोन्ही सामन्यांमध्ये युवा आयुष बदोनीने केलेल्या विस्फोटक खेळीची सध्या […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजाएंट संघाने गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नईने विजयासाठी दिलेलं द्विशतकी धावसंख्येचं आव्हान लखनऊने एविन लुईस आणि आयुष बदोनी या दोन खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. गुजरातविरुद्ध पहिल्या सामन्यात लखनऊच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतू या दोन्ही सामन्यांमध्ये युवा आयुष बदोनीने केलेल्या विस्फोटक खेळीची सध्या चांगलीच चर्चा होते आहे.

हे वाचलं का?

गुजरातविरुद्ध सामन्यात २२ वर्षीय आयुष बदोनीने ४१ बॉलमध्ये ३ सिक्स आणि ४ फोर लगावत ५४ धावा केल्या होत्या. या अर्धशतकासह त्याने एक विक्रमही आपल्या नावे जमा केला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करत सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

Kaun Pravin Tambe?: ‘मुलं मोठी होईपर्यंत माझा संघर्ष सुरु होता,आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं’

गुजरातविरुद्ध सामना संपल्यानंतर चेन्नईविरुद्ध सामन्यातही आयुष बदोनीने कोणतंही दडपण न घेता फटकेबाजी करत सामना चेन्नईच्या हातातून खेचून आणला. या दोन आश्वासक खेळींनंतर सोशल मीडियावर सर्वत्र आयुष बदोनीची चर्चा सुरु आहे. अनेक माजी खेळाडूंनी याबद्दल आयुषचं कौतुकही केलं आहे. तर चर्चेत आलेला हा आयुष बदोनी नेमका आहे तरी कोण हे आपण आज जाणून घेऊयात…

IPL 2022 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, लुईसच्या फटकेबाजीमुळे लखनऊची सामन्यात बाजी

आयुष बदोनी हा स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळतो. तो अष्टपैलू खेळाडू असून मधल्या फळीत खेळताना आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने भारतीय संघाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १८५ धावांची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बदोनीने २०१८ साली १९ वर्षांखालील आशिया चषकात शानदार कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. यानंतर जानेवारी २०२१मध्ये त्याने आपले टी२० पदार्पण केले होते.

पंधराव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात आयुष बदोनीवर लखनऊच्या संघाने २० लाखांची बोली लावली होती. पहिल्या दोन सामन्यांत धडाकेबाज खेळी करत आयुष बदोनीने आपली निवड सार्थ ठरवून दाखवली आहे.

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दहा हत्तींचं बळ, सूर्यकुमार यादव संघात दाखल

    follow whatsapp