Jitendra Awahad On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली होती, यावर प्रतिक्रिया देताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांच्या हृदयात जे काही प्रेम दिसतंय, ते फार चांगलं आहे. मला त्याबद्दल आनंदच आहे. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते आणि साधा फोनही केला नव्हता. याचं मला दु:ख आहे. माणूस बदलतो, ते बदलले, ते चांगलंच झालं. महाराष्ट्रासाठी चांगलं झालं. त्यांच्या घरच्यांसाठी चांगलं झालं. पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते, याचं मला दु:ख आहे. शरद पवार तर तेच आहेत ना..शरद पवारांमध्ये काही बदल झालेला नाही ना..
ADVERTISEMENT
अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली, हा बदल कशामुळे झाला? यावर बोलताना आव्हाड म्हणाले, ते अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारा. माणसामध्ये कशामुळे बदल होतो, हे सांगता येत नाही. सुक्ष्म नजरेनं बघणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं की, मागच्या वर्षी गेले नव्हते, यावर्षी गेले. आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार म्हणाल्या की, राज्यातील कार्यकर्त्यांना वाटतं की, दोन्ही पवारांनी एकत्र यावं आणि आपली राजकीय ताकद मजबूत करावी, यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, पवार कुटुंबीय काय बोलतात, याबाबत माझ्याकडून उत्तराची कधीही अपेक्षा करू नका.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील 'त्या' महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत पवारांची भेट घेतली होती. अजित पवारांनी ट्वीटरच्या माध्यमातूनही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, "शरद पवार साहेबांसोबत परभणी, राज्यसभा आणि लोकसभेबद्दल चर्चा झाली. मंत्रिमंडळाचं काय झालं, हिवाळी अधिवेशन वैगेरे गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली. आमच्यातचहा-नाष्टा झाला. वाढदिवसानिमित्त पवार साहेबांना सगळेच शुभेच्छा द्यायला येत असतात. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे शिकवलं आहे".
हे ही वाचा >> Allu Arjun Arrest: संध्या थिएटरच्या घटनेला अल्लू अर्जुनच जबाबदार? 'त्या' लेटरने उडवली खळबळ!
ADVERTISEMENT
