Hardik Pandya New Captain of mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवले असून, यंदाच्या हंगामाता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने दहा वर्षे कर्णधार नेतृत्व केले.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामापूर्वीच संघाच्या नेतृत्वात बदल केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद सांभाळत होता. मात्र, यावेळी मुंबईने नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला. 19 डिसेंबर रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी मुंबईने कर्णधार पदाची घोषणा केली.
मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात महेला जयवर्धनने म्हटलं आहे की, “मुंबई इंडियन्सला सचिनपासून ते हरभजसिंग आणि रिकी पाँटिंगपासून रोहितपर्यंत असामन्य नेतृत्व मिळालं आहे. त्यांनी संघाला यश मिळवून देण्याबरोबरच संघ बांधणीही केली. या हंगामासाठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळेल.”
सर्वाधिक यशस्वी कर्णधाराला हटवले
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या कर्णधाराला हटवण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या त्याची जागा घेणार आहे. मुंबई इंडियन्सने 2024 च्या लिलावापूर्वी गुजरात टायटन्सकडून खरेदी केले होते. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयात रोखीने खरेदी केले होते.
हार्दिक पांड्याला गुजरातकडून खरेदी केल्यापासूनच नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने खूप चांगली कामगिरी केली होती. दोन्ही वेळा गुजरात टायटन्स अंतिम फेरीत पोहोचली होती. हार्दिकच्या नेतृत्वातच आयपीएल 2022 च्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते.
ADVERTISEMENT