Pat Cummins: तिसऱ्या कसोटीआधीच ऑस्ट्रेलियाला झटका; दिग्गज प्लेयर संघाबाहेर

मुंबई तक

• 02:08 AM • 24 Feb 2023

Ind vs aus test series: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन (Third Test india vs Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. (Pat Cummins has been ruled out of the third match) दुसरा सामना संपल्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता आणि तो तिसऱ्या सामन्यासाठी परतणार नाही. […]

Mumbaitak
follow google news

Ind vs aus test series: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन (Third Test india vs Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. (Pat Cummins has been ruled out of the third match) दुसरा सामना संपल्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतला होता आणि तो तिसऱ्या सामन्यासाठी परतणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती दिली आहे. Cricket Australia has given information about this

हे वाचलं का?

Harmanpreet Kaur : …अन् संताप झाला अनावर, मैदानातच फेकली बॅट, पाहा काय घडलं?

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या सलग दुसऱ्या कसोटी पराभवानंतर कमिन्स गेल्या आठवड्यात सिडनीला रवाना झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमिन्सच्या आईची तब्येत ठीक नाही.

मी माझ्या कुटुंबासह येथे असणं गरजेचं : कमिन्स

दिल्ली कसोटी तीन दिवसांत संपल्यानंतर एकूण नऊ दिवसांचा ब्रेक आहे. अशा स्थितीत बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी 29 वर्षीय कमिन्स भारतात परतेल, अशी अपेक्षा होती. मात्र ते शक्य झाले नाही. अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीसाठी कमिन्स येणार की नाही हे पाहावे लागेल. कमिन्स म्हणाला, ‘मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटते की मी माझ्या कुटुंबासह येथे असणं गरजेचं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

दुसरी कसोटी संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ पत्नीसह काही दिवसांच्या सहलीसाठी दुबईला गेला होता. तेथे पुढील कसोटीसाठी कमिन्सच्या बाहेर होण्याच्या निर्णयाची माहिती त्याला मिळाली. 2021 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्मिथने अॅडलेडमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.

ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने निवडली ही मजबूत टीम; भारतासाठी तगडं आव्हान

याआधीही स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती

स्मिथ 2014 ते 2018 दरम्यानच्या 34 कसोटी सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार होता. ज्यात 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा देखील समाविष्ट होता. त्या दौऱ्यात स्मिथने तीन शतके झळकावली. मात्र, यावेळी या उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ही मालिका निराशाजनक ठरली असून त्याने आतापर्यंत चार डावांत 23.66 च्या सरासरीने 71 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023 (उर्वरित सामने)

• तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च (इंदौर)

• चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)

• पहिली वनडे – 17 मार्च (मुंबई)

• दुसरी एकदिवसीय – 19 मार्च (विशाखापट्टणम)

• तिसरी एकदिवसीय – 22 मार्च (चेन्नई)

    follow whatsapp