R Ashwin retirement : रविचंद्रन अश्विनने केली निवृत्तीची घोषणा, नेमकं कारण काय?

मुंबई तक

18 Dec 2024 (अपडेटेड: 18 Dec 2024, 11:44 AM)

अश्विनच्या निवृत्तीची घोषणा त्याचवेळी करण्यात आली जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये भावूक दिसत होता आणि विराट कोहलीने त्याला मिठी मारली होती, मात्र त्याची अधिकृत घोषणा सामन्यानंतर करण्यात आली.

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुस-या सामन्यात अश्विनला संधी मिळाली, पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

रवींद्र जडेजाने ब्रिस्बेनमध्ये चांगली फलंदाजी केल्यामुळे कदाचित त्याला भविष्यात संधी मिळण्याची आशा कमी आहे. अश्विनच्या निवृत्तीची घोषणा त्याचवेळी करण्यात आली जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये भावूक दिसत होता आणि विराट कोहलीने त्याला मिठी मारली होती, मात्र त्याची अधिकृत घोषणा सामन्यानंतर करण्यात आली. आर अश्विन स्वतः कर्णधार रोहित शर्मासोबत सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आला आणि त्याने तत्काळ निवृत्तीची घोषणा केली.

हे ही वाचा >> Maharashtra Weather Updates : बारामतीत सर्वात कमी तापमानाची नोंद, राज्यात आज कुठे-किती तापमान?

हे वाचलं का?



287 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. मात्र, तरीही तो IPL खेळत राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच CSK ने त्याला 9.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. 2025 मध्ये त्यानं चांगली कामगिरी केल्यास चेन्नई संघ त्याला पुन्हा कायम ठेवू शकतो. अश्विनने सीएसकेच्या अकादमीशीही भागीदारी केली आहे, तिथे त्याला मोठं पद मिळालं आहे. आता तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार नाही.



 

    follow whatsapp