Thane Jewellery Shop Robbery : ठाण्यात मध्यरात्री भला मोठा दरोडा, कोट्यवधींचं सोनं लंपास, सोनाराला 'ही' चूक नडली?

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका दुकानात मंगळवारी रात्री दीड ते पहाटे चारच्या दरम्यान हा दरोडा पडल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

18 Dec 2024 (अपडेटेड: 18 Dec 2024, 10:52 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री भला मोठा दरोडा

point

तब्बल 7 कोटी रुपयांचं सोनं लंपास

point

दुकानदारानं केली 'ही' लहानशी चूक

ठाणे शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर मोठा दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. दोन आरोपींनी या दुकानात प्रवेश करून तब्बल 7 कोटी रुपये किमतीचे 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली असून, या प्रकरणामुळे ठाण्यात सध्या खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Apps Ban in India : भारत सरकारने 'या' 14 Applications वर बंदी का घातली, काय होतं कारण? समोर आली धक्कादायक माहिती

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका दुकानात मंगळवारी रात्री दीड ते पहाटे चारच्या दरम्यान हा दरोडा पडल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे. नौपाडा पोलिसांनी सांगितलं की, चोरट्यांनी आधी दुकानाच्या पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाचं कुलूप तोडलं आणि नंतर दुकानाचं शटर उचकटून त्यांनी आत शिरत दागिने लंपास केले.

दुकानात सुरक्षेच्या दृष्टीनं फार काही केलेलं नसल्याचं आढळून आलं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितले की, ज्वेलर्स  महागडे दागिने रात्री तिजोरीत ठेवत असतात. पण या दुकानात मौल्यवान वस्तू वरतील ठेवलेल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांना कमी वेळेत हा मोठा ऐवज लंपास करता आला.

हे ही वाचा >>Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अचानक घेतली CM फडणवीसांची भेट... शिंदेंना शह?

सुरक्षेतील त्रुटींमुळे दरोडेखोरांना काही वेळातच चोरी करता आली. नौपाडा पोलिसांनी संबंधित अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी अनेक तपास पथकं तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितलं की,  दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचं काम सुरू आहे. तसंच स्थानिकांची चौकशीही करण्यात येत आहे. गुन्हेगारांना ओळखण्यासाठी फॉरेन्सिक पुराव्यांचंही विश्लेषण करण्यात येतंय. आमची टीम पुरावे गोळा करत असून गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रत्येक संभाव्य सुगावा शोधत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp