Optical Illusion IQ Test: इंटरनेटवर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो तुफान व्हायरल होतात. रोजच्या धावपळीच्या प्रवासात सुस्तावलेल्या मेंदुला चालना देण्यासाठी अनेक लोक ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात. पण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी या लोकांना त्यांच्या बुद्धीला चालना द्यावी लागते. जे लोक असे फोटो टाईमपास म्हणून बघतात, त्या लोकांना ऑप्टीकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये यशस्वी होता येत नाही. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या एका फोटोनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण हा फोटो एका जंगलाचा असून या जंगलात लपलेली तरुणी फक्त 14 सेकंदांमध्ये शोधून दाखवायची आहे.
ADVERTISEMENT
या फोटोकडे पाहिलं तर एक घनदाट जंगल आहे. या जंगलात दोन मोठी झाडे असल्याचं पाहायला मिळत आहे. या झाडांना मोठ मोठ्या फांद्याही असल्याचं या फोटोत दिसतंय. पण या झाडांमध्ये कुठेतरी एक तरुणी लपलीय. या तरुणीला शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागणार आहे. जे लोक तल्लख बुद्धीचा वापर करतील, अशा व्यक्तींनाचा या जंगलात लपलेली तरूणी शोधता येणार आहे.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: "मला मंत्रिपदाची एवढी हाव असती, तर..."; छगन भुजबळ 'हे' काय बोलून गेले
ज्या लोकांना या फोटोत म्हणजेच जंगलात लपलेली तरुणी चौदा सेकंदांच्या आत शोधण्यात यश आलं आहे, त्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्या लोकांना या फोटोत असलेली तरुणी शोधण्यात अपयश आलं आहे. ती माणसं अजूनही शर्थीचे प्रयत्न करू शकतात. पण ज्या लोकांना एवढे प्रयत्न करूनही फोटोत लपलेली तरुणी शोधता आली नाही, त्यांना आम्ही या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टचं बरोबर उत्तर सांगणार आहोत. म्हणजेच या जंगलात ही तरुणी नेमकी कुठे लपली आहे, ते सांगणार आहोत. या फोटोत ज्या ठिकाणी लाल रंगाचं सर्कल दाखवण्यात आलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की, झाडांच्या वेलीचा आकार मुलीच्या चेहऱ्यासारखा आहे.
हे ही वाचा >> Gateway of India Boat Accident: नौदलाच्या बोटीने सरळसरळ मारली धडक, 'तो' भयानक Video जसाच्या तसा...
ADVERTISEMENT