Tokyo Olympic 2021 : ६ कोटी ते २५ लाख, पदक विजेत्या खेळाडूंसाठी राज्य सरकारकडून बक्षीसांची घोषणा

मुंबई तक

• 10:55 AM • 14 Jul 2021

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. २३ जुलैपासून जपानमध्ये या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असले तरीही भारताला पदकाच्या आशा मात्र फार मोजक्या आहेत. पदकासाठी प्रबळ दावेदारांपैकी कुस्तीत बजरंग पुनिया, तिरंदाजीत अतानु दास या खेळाडूंची नावं पुढे येत आहेत. बजरंग पुनियाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं तर […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. २३ जुलैपासून जपानमध्ये या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असले तरीही भारताला पदकाच्या आशा मात्र फार मोजक्या आहेत. पदकासाठी प्रबळ दावेदारांपैकी कुस्तीत बजरंग पुनिया, तिरंदाजीत अतानु दास या खेळाडूंची नावं पुढे येत आहेत.

हे वाचलं का?

बजरंग पुनियाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं तर त्याला राज्य सरकारकडून ६ कोटी मिळणार आहेत. अतानू दासने सुवर्णपदक जिंकलं तर त्याला २५ लाख मिळणार आहेत. खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करावी यासाठी संबंधित राज्य सरकारांनी रोख रक्कमेची बक्षीस जाहीर केली आहेत. ज्यात हरियाणा सर्वात आघाडीवर असून मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ६ कोटी बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

Tokyo Olympic 2021 : बीडचा सुपुत्र टोकियो गाजवण्याच्या तयारीत, कोण आहे अविनाश साबळे?

या यादीत पश्चिम बंगाल हे सर्वात खालच्या स्तरात असून महाराष्ट्र सरकारने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. हरियाणाव्यतिरीक्त उत्तर प्रदेश, ओडीशा यांनीही आपल्या खेळाडूंसाठी भरघोस रक्कमेची घोषणा केली आहे.

जाणून घेऊयात कोणत्या राज्याने खेळाडूंसाठी सर्वाधिक बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

६ कोटी – हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडीशा, चंदीगढ

५ कोटी – कर्नाटक, गुजरात

३ कोटी – दिल्ली, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू

२.२५ कोटी – पंजाब

२ कोटी – हिमाचल प्रदेश, झारखंड, तेलंगणा

१.५ कोटी – उत्तराखंड

१.२ कोटी – मणीपूर

१ कोटी – महाराष्ट्र, केरळ, गोवा

७५ लाख – मेघालय

५० लाख – जम्मू आणि काश्मीर

२५ लाख – पश्चिम बंगाल

राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसाच्या रकमेशिवाय केंद्र सरकारकडून पदक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख (सुवर्ण पदक), ५० लाख (रौप्य पदक), ३० लाख (कांस्य पदक) अशी रक्कम मिळणार आहेत. त्यामुळे यंदा कोणते खेळाडू भारताचा झेंडा जपानमध्ये फडकावून मालामाल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Video : कसं काय? Tokyo Olympic ला जाणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवला मोदी जेव्हा मराठीतून प्रश्न विचारतात…

    follow whatsapp