टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा धवन यांचं नात संपुष्टात आलं आहे. आयेशा धवनने आपलं नातं संपुष्टात आल्याची माहिती इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिली आहे. २०१२ साली शिखर धवनने मेलबर्नस्थित आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं.
ADVERTISEMENT
आयेशाच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या दोन मुलींना शिखरने दत्तक घेतलं होतं. आयेशा आणि शिखर यांना झोरावर नावाचा एक मुलगाही आहे.
या घटनेशी संबंधित सूत्रांनी ANI शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
३० ऑक्टोबर २०१२ रोजी शिखर आणि आयेशा यांचं लग्न झालं होतं. आयेशा ही मुळची पश्चिम बंगालची आहे. वयाच्या ८ व्या वर्षी ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. ४६ वर्षीय आयेशाचं पहिलं लग्न ऑस्ट्रेलियातील एका उद्योगपतीने झालं होतं. पहिल्या लग्नातून आयेशाला २००० साली आलिया आणि २००५ साली रेहा अशा दोन मुली झाल्या.
ADVERTISEMENT