Suryakumar Yadav : एका कॅचने फिरवली मॅच, सूर्यकुमारने सांगितला सगळा किस्सा

मुंबई तक

• 03:50 PM • 30 Jun 2024

Suryakumar Yadav News : सुर्यकुमार यादव कामगिरी खूप मोठी होती. कारण त्याने बाऊन्ड्री लाईनवर अशक्य वाटणारी विनिंग कॅच घेतली होती. या कॅचनंतरच संपूर्ण मॅच फिरली होती. या कॅच दरम्यानचा तो संपूर्ण प्रसंग आता सुर्य कुमार यादवने सांगितला आहे.

   suryakumar yadav match winning catch in final india vs south africa t20 world cup 2024

कॅच दरम्यानचा तो संपूर्ण प्रसंग आता सुर्य कुमार यादवने सांगितला आहे.

follow google news

Surykumar Yadav Catch Video Viral : टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत तब्बल 13 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी या विजयात मोलाची भुमिका बजावली. मात्र यात सुर्यकुमार यादव कामगिरी खूप मोठी होती. कारण त्याने बाऊन्ड्री लाईनवर अशक्य वाटणारी विनिंग कॅच घेतली होती. या कॅचनंतरच संपूर्ण मॅच फिरली होती. या कॅच दरम्यानचा तो संपूर्ण प्रसंग आता सुर्य कुमार यादवने सांगितला आहे. ( suryakumar yadav match winning catch in final india vs south africa t20 world cup 2024) 

हे वाचलं का?

शेवटच्या ओव्हरचा थरार...

 खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. यावेळी रोहितने हार्दिकच्या हातात बॉल दिला होता. हार्दिकने पहिलाच बॉल टाकला तो डेविड मिलरने बाऊन्ड्रीच्या दिशेने उडवला होता. मात्र सुर्यकुमार यादवने उत्कृष्ट फिल्डींग करून भन्नाट कॅच घेतला. हा कॅच सामन्याचा मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 5 बॉलमध्ये 16 धावा हव्या होत्या. मात्र हार्दिकने 8 धावात रोखत 7 धावांनी हा सामना जिंकला. 

हे ही वाचा : "जे लोक मला एक टक्काही...", रडतच हार्दिकने सांगितल्या वेदना

 सुर्या काय म्हणाला? 

 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर आज तकचे व्यवस्थापकीय संपादक विक्रांत गुप्ता यांनी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्याशी खास बातचीत केली.यावेळी विक्रांत गुप्ता यांनी सुर्याला त्या विनिंग कॅचबद्दल विचारले. यावर सुर्या म्हणाला, माझा अजूनही विश्वास बसत नाही. ती कॅच मॅच विनिंग कॅच होती, पण आम्ही टूर्नामेंट जिंकली. लोक आता म्हणू लागले आहेत की जेव्हा 16 धावा हव्या होत्या, जर षटकार असता तर 5 चेंडूत 10 धावा लागल्या असत्या. मात्र यानंतर संपूर्ण सामन्याचे चित्र वेगळे असते. पण त्यावेळेला मला जे योग्य वाटले ते मी केले. 

आई-बाबांशी व्हिडिओ कॉलवर बातचीत 

सामना जिंकल्यानंतर मी माझ्या पत्नीला मिठी मारली आणि खूप रडलो, असे देखील सुर्याने सांगितले.  सामना जिंकल्यानंतर मी माझ्या पालकांशी व्हिडिओ कॉलवर बोललो आणि त्यांनी मला सांगितले की संपूर्ण रस्ता जाम आहे, लोक रस्त्यावर आनंद साजरा करत आहेत. पण दोन-तीन दिवसांनी भारतात पोहोचल्यावर संपूर्ण वातावरण दिसेल. 

हे ही वाचा : T20 World Cup ट्रॉफीसोबत 'टीम इंडिया'ला मिळाले 'इतके' कोटी; इतर संघांना किती कोटी? 

 2023 वर्ल्ड कपची कटू आठवण काढताना सुर्या म्हणाला, 2023 च्या विश्वचषकात आम्ही खेळलो तेव्हा आमचे कुटुंब खाली आले होते. बसमध्ये बसून ग्राऊंडवर जाताना वाटले की आपण जाऊन ट्रॉफी उचलावी, असे सगळे वातावरण तयार झाले होते पण आम्ही हरलो होतो असे सुर्या म्हणाला. 

    follow whatsapp