T20 World Cup ट्रॉफीसोबत 'टीम इंडिया'ला मिळाले 'इतके' कोटी; इतर संघांना किती कोटी?

मुंबई तक

30 Jun 2024 (अपडेटेड: 30 Jun 2024, 01:13 PM)

T20 World Cup Winner Prize Money : अनेक वर्षांपासूनचे भारतीयांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. टीम इंडियाने टी20 विश्वचषक जिंकला. या विजयामुळे टीम इंडियावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस बक्षीस रुपाने पडला आहे. 

विश्व चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला किती मिळाले बक्षीस?

दक्षिण आफ्रिकेला हरवत टीम इंडियाने टी20 विश्व चषकावर नाव कोरले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

T20 World Cup 2024 Prize Money

point

टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाला किती मिळाले पैसे?

point

उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला किती कोटी मिळाले?

T20 world cup prize money : हातातून निसटलेल्या सामन्यावर पुन्हा पकड मिळवत टीम इंडियाने टी20 विश्वचषकाला गवसणी घातली. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव कला. 13 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारत आयसीसी स्पर्धेचा विजेता ठरला. या विश्वचषकासोबत भारतीय संघाला घसघशीत बक्षीसही मिळालं आहे. ही प्राईज मनी किती आहे आणि इतर संघांना किती कोटी मिळाले, हेच जाणून घ्या... (T20 World Cup Winner Prize Money)

हे वाचलं का?

यावेळी टी20 विश्व चषक स्पर्धेच्या एकूण प्राईजची रक्कम होती 11.25 मिलियन डॉलर म्हणजे 93 करोडो रुपये. यात टी20 विश्व चषक विजेत्या संघासाठी प्राईज होते 2.45 मिलियन डॉलर म्हणजे 20.40 कोटी रुपये. त्याचबरोबर बोनस दिला जाणार आहे. म्हणजे टीम इंडियाला 20.45 कोटी रुपये आणि बोनस मिळेल. ही रक्कम आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमध्ये दिलेल्या रकमेच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 

दक्षिण आफ्रिका संघाला किती कोटी?

टी20 विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा संघ पोहोचला, पण पुन्हा एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. विश्व चषक स्पर्धेचा उपविजेता ठरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 1.28 मिलियन डॉलर म्हणजे 10.67 कोटी रुपये मिळतील.

हेही वाचा >> रोहित शर्मानेही घेतला 'तो' निर्णय, म्हणाला... 

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 78,7500 डॉलर म्हणजे 6.48 कोटी रुपये मिळतील. विश्व चषक स्पर्धेत खेळलेल्या संघांनाही ठराविक रक्कम मिळणार आहे. 

T20 World Cup : कोणत्या संघांना किती पैसे मिळणार?

भारतीय संघ - 20.40 कोटी रुपये 
दक्षिण आफ्रिका - 10.67 कोटी रुपये
अफगाणिस्तान -6.48 कोटी रुपये
इंग्लड -6.48 कोटी रुपये

सुपर 8 मधील संघांना - 3.16 कोटी रुपये

जिंकलेल्या सामन्यासाठी - 26 लाख रुपये. 

T20 World Cup Final : सगळ्यांचे रोखले गेले श्वास

टी20 विश्व चषक स्पर्धेतील अंतिम सामना क्रिकेटप्रेमींसाठी ह्रदयाचे ठोके चुकवणारा ठरला. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. पण, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या. यात विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. अक्षर पटेलने 47 धावा, तर शिवम दुबेने 27 धावा केल्या.

 

दक्षिण आफ्रिका संघाला 169 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी धावांची गरज होती. हार्दिक पंड्या गोलंदाजी करायला आला.

हेही वाचा >> अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या, कारण समोर 

पहिल्याच चेंडूवर पंड्याने डेव्हिड मिलरला बाद केले. सूर्यकुमार यादवने सीमा रेषेवर अप्रतिम झेल घेतला, ज्यामुळे सामन्याचे चित्रच बदलले. मिलर बाद झाल्यानंतर रबाडा फलंदाजीला आला. रबाडाने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. 

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 4 चेंडूत 12 धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव आफ्रिकेला मिळाली. त्यानंतर पंड्याने वाईड बॉल टाकला. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रबाडा बाद झाला. शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेता आली आणि दक्षिण आफ्रिका 7 धावांनी पराभूत झाली. 

    follow whatsapp