Rohit Sharma Retire : साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियाने आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2024) नाव कोरले आहे. टीम इंडियाने (Team India) तब्बल 13 वर्षानंतर ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि आता रविंद्र जडेजाने टी20 तून निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मनात निवृत्तीचा विचार अजिबात नव्हता,असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे रोहित शर्माने अचानक निर्णय का घेतला? हे जाणून घेऊयात. (team india why rohit sharma decide to retire from t20 international cricket t20 world cup 2024)
ADVERTISEMENT
रोहित शर्मा यावेळी म्हणाला की, मी T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कधीच विचार केला नव्हता. पण वर्ल्ड कप ट्रॉफीसह निवृत्त होण्यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. त्यामुळे रोहितने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेण्याचा कधीच विचार केला नव्हता, पण विराट कोहलीप्रमाणे त्याला युवा खेळाडूंसाठी मार्ग काढायचा होता, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अख्खं कुटुंब भुशी डॅममध्ये...काय घडलं?
टी-20 ला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही.मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी आतून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही किंवा मागच्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर हा विश्वचषक खेळणार की नाही याचा विचारही केलेला नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहित म्हणाला की, मला विश्वास आहे की जे काही लिहिले आहे ते होईल. मला वाटतं जे काही झालं ते आधीच लिहिलं गेलं होतं. पण सामन्यापूर्वी काय लिहिले आहे ते कळत नाही. हा खेळ आहे, हा गेम आहे. नाहीतर लिहिल्याप्रमाणे आरामात आलो असतो,असेही रोहित शर्मा म्हणाले.
हे ही वाचा : ''दगडफेक, गाड्या फोडल्या...हे सगळं भुजबळ घडवतोय'', जरांगेंचा गंभीर आरोप
परिस्थिती आणि विश्वचषकाची प्रतीक्षा लक्षात घेता, शनिवारी मिळालेला विजय हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय होता. या विजयासाठी मी खूप आतुर होतो. गेल्या काही वर्षांत मी किती धावा केल्या आहेत, हे मला महत्त्वाचे वाटते, परंतु मी आकडेवारी आणि अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. तसेच देशासाठी सामने जिंकणे, देशासाठी ट्रॉफी जिंकणे, हीच गोष्ट आहे ज्याची मी नेहमीच वाट पाहतो. आता माझ्याकडे ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे रोहित म्हणाला आहे.
ADVERTISEMENT