आगामी टी-२० विश्वचषकासाठी २४ ऑक्टोबर या दिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी या दिवशी आपापसात भिडणार आहेत. या सामन्याआधीच दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. परंतू पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या मते पहिल्या सामन्यात भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या संघाला जिंकण्याची जास्त संधी आहे.
ADVERTISEMENT
टी-२० वर्ल्डकप असो किंवा वन-डे भारताचा इतिहास आतापर्यंत वरचढ राहिला आहे. आतापर्यंत पाकिस्तानचा संघ भारताला विश्वचषक स्पर्धेत एकदाही पराभूत करु शकला नाहीये. परंतू पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने यंदा भारताला आपण हरवूच असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
“प्रत्येक सामन्याआधी संघावर असणाऱ्या दडपणाचा आम्हाला अंदाज आहे, विशेषकरुन भारताविरुद्ध सामना असेल त्याचाही. मला आशा आहे की पहिली मॅच आम्ही जिंकून हा विजयरथ पुढे कायम सुरु ठेवू. आम्ही गेली ३-४ वर्ष युएईत क्रिकेट खेळत आहोत, तिकडच्या वातावरणाशी जुळवून घेणं आम्हाला माहिती आहे. युएईत खेळपट्टी कसे रंग दाखवते आणि त्यानुसार फलंदाजांना कसं सावरुन घ्यावं लागतं हे आम्हाला माहिती आहे. ज्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो सामना जिंकणार, पण तुम्ही मला विचाराल तर पाकिस्तानच हा सामना जिंकेल.” बाबर आझम आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
२०१६ पासून पाकिस्तानचा संघ दुबईत सहा टी-२० सामने खेळला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकाही सामन्यात पाकिस्तानने पराभव स्विकारलेला नाहीये. त्यामुळे दोन्ही संघामधलं हे पारंपरिक युद्ध कोण जिंकणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलेलं आहे.
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
ADVERTISEMENT