Ind vs Pak : आज नाहीतर उद्या, आम्ही कधीतरी हरुच, धोनीने ५ वर्षांपूर्वी केलं होतं भारताच्या पराभवाचं भाकीत

मुंबई तक

• 10:50 AM • 25 Oct 2021

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ हा नेहमी पाकिस्तानच्या वरचढ राहिला होता. परंतू यानिमीत्ताने हा रेकॉर्ड तुटला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका सुरु आहे. परंतू टीम […]

Mumbaitak
follow google news

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ हा नेहमी पाकिस्तानच्या वरचढ राहिला होता. परंतू यानिमीत्ताने हा रेकॉर्ड तुटला आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका सुरु आहे.

हे वाचलं का?

परंतू टीम इंडियाचा सध्याचा मेंटॉर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताच्या या पराभवाचं भाकित करुन ठेवलं होतं. धोनीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ २०१६ च्या टी-२० विश्वचषकातला आहे. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना धोनीने महत्वाचं वक्तव्य केलं होतं.

T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव का झाला? जाणून घ्या कारणं..

ज्यात धोनी म्हणतो…

“अर्थातच आम्हाला या विक्रमाचा (11-0 ने आघाडीवर असल्याचा) अभिमान वाटला पाहिजे. विश्वचषकात आपण पाकिस्तानसोबत कधीही हरलो नाही, या गोष्टीचा अभिमान आहेच, परंतु नेहमीच असेच होईल असे नाही. आज नाहीतर उद्या, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी कदाचित 50 वर्षांनी, कधीतरी आपण नक्कीच हरणार आहोत.” धोनीच्या या वक्तव्यानंतर ५ वर्षांनी भारताला या गोष्टीचा प्रत्यय आला आहे.

भारताची सुमार फलंदाजी –

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानी सलामीवीरांकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई –

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

    follow whatsapp