ADVERTISEMENT
नेदरलँडची मारिया वेटेल ही जागातील सगळ्यात उंच महिला बॉडी बिल्डर आहे.
मारियाची उंची 5 फूट 11.92 इंच एवढी असून तिचं वजन 90 किलो एवढं आहे.
मारियाची मैत्रीण ओलिविअर रिक्टर्सने तिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता.
मारिया जेव्हा 19 वर्षांची होती तेव्हा तिने बॉडी बिल्डिंग करणं सुरु केलं होतं.
2005 साली तिने पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेतला होता
यानंतर तिने जगभरातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक जेतेपद पटकावले.
तिने याबाबत असंही सांगितलं की, तिची उंची अधिक असल्याने अनेक स्पर्धांपासून तिला आयोजकांनी लांबच ठेवलं होतं.
मारिया ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
ती वर्कआऊट, स्पर्धेतील आपले फोटो आणि व्हीडिओ देखील शेअर करते.
ती असं यासाठी करते जेणेकरुन ते पाहून इतर महिला देखील या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित होतील.
ADVERTISEMENT