इंग्लंडमधील साऊदम्प्टनच्या मैदानावार खेळवण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतावर ८ गडी राखून मात करत पहिलं विजेतेपद पटकावलं. दोन वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताने आपलं वर्चस्व राखत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. परंतू अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी केलेल्या बेजबाबदार खेळामुळे टीम इंडियाला विजय मिळवता आली नाही.
ADVERTISEMENT
दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या दुसऱ्या हंगामातलं भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आगामी हंगामात भारताला ३ मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका बाहेरील देशांत खेळायच्या आहेत. ज्यात भारत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध बाहेरच्या मैदानावर तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याशी घरच्या मैदानावर खेळणार आहे.
BLOG : प्रश्न इतकाच की BCCI ती हिंमत दाखवणार का?
असं असेल भारताचं आगामी हंगामातलं वेळापत्रक –
-
भारत विरुद्ध इंग्लंड – (ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१) – ५ कसोटी
-
भारत विरुद्ध न्यूझीलंड – (नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१) – २ कसोटी
-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – (डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२२) – ३ कसोटी
-
भारत विरुद्ध श्रीलंका – (फेब्रुवारी – मार्च २०२२) – ३ कसोटी
-
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – (नोव्हेंबर २०२२) – ४ कसोटी
-
भारत विरुद्ध बांगलादेश – (नोव्हेंबर – डिसेंबर २०२२) – २ कसोटी
अशी असेल गुणांकनाची पद्धत –
WTC च्या पहिल्या हंगामात आयसीसीने दोन पेक्षा अधिक कसोटी मालिकेसाठी १२० गूण आणि एका कसोटी मालिकेत ४ सामने असतील तर प्रत्येक सामन्याला ३० गुण अशी पद्धत ठेवली होती. परंतू यावेळी अशी पद्धत नसणार आहे, प्रत्येक सामन्यासाठी समान गुण देण्याचं आयसीसीने ठरवलं आहे. या शिवाय विजयाची टक्केवारी ही गुणतालिका ठरवताना वापरली जाईल.
WTC Final : जाणून घ्या भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं
ADVERTISEMENT