प्रशांत भट, प्रतिनिधी (टोकियो)
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आज टोकियो शहरात सर्व सहभागी देशांचा संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्यात भारतीय पथकाचं नेतृत्व बॉक्सर मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंग यांनी केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला काही ठराविक मान्यवरांचा अपवाद वगळता एकाही प्रेक्षकाला उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली नव्हती.
सहा वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी कोमकडून यंदा भारताला पदकाच्या आशा आहेत. तसेच मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हॉकीमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. टोकियोच्या नॅशनल स्टेडीयमवर जपानच्या संस्कृतीचं दर्शन घडवत अत्यंत दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याला ५ हजार ७०० खेळाडूंनी हजेरी लावली. काही खेळाडूंना उद्या सकाळी लगेच स्पर्धेसाठी हजेरी लावायची असल्यामुळे त्यांनी या सोहळ्याला उपस्थित रहायचं टाळलं. त्यामुळे या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू किती पदकांची लयलूट करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT