टी-२० क्रिकेटमध्ये कोण असेल Virat Kohli चा उत्तराधिकारी? दोन खेळाडूंची नाव चर्चेत

मुंबई तक

• 03:54 PM • 16 Sep 2021

गुरुवारचा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक ठरला. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विराटने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या ८-९ वर्षांपासून आपल्यावर येत असलेला ताण पाहता आपण हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीने सांगितलं. ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून अखेरचा विश्वचषक असणार […]

Mumbaitak
follow google news

गुरुवारचा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक ठरला. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विराटने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या ८-९ वर्षांपासून आपल्यावर येत असलेला ताण पाहता आपण हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीने सांगितलं.

हे वाचलं का?

ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून अखेरचा विश्वचषक असणार आहे. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेत असला तरीही आपण संघाच्या मदतीसाठी कायम हजर असू असं विराटने सांगितलं. त्यामुळे विराट नंतर भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्व कोणाकडे जाईल याबद्दल चर्चेला सुरुवात झाली आहे.

१) पहिला पर्याय – रोहित शर्मा

सध्या भारतीय संघाचं लाईन-अप लक्षात घेता दोन खेळाडू कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यात पहिलं आणि आघाडीवर असलेलं नाव म्हणजे टीम इंडियाचा उप-कर्णधार रोहित शर्मा. आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी आणि निदहास ट्रॉफी व आशिया चषकातली उत्तम कामगिरी ही रोहित शर्माची कर्णधार म्हणून जमेची बाजू आहे.

आंतरराष्ट्रीय-आयपीएल क्रिकेटमध्ये रोहितची कर्णधार म्हणून आतापर्यंतची कामगिरी –

वन-डे क्रिकेट

१० सामने, ८ विजय, २ पराभव

टी-२० क्रिकेट

१० सामने, १५ विजय, ४ पराभव

आयपीएल क्रिकेट

१०४ सामने, ६० विजय, ४२ पराभव, दोन सामने बरोबरीत

या अनुभवाच्या जोरावर रोहित शर्माकडे टी-२० संघाचं कर्णधारपद जाण्याची दाट शक्यता आहे. मैदानावर कर्णधार म्हणून रोहितची रणनिती ही एखाद्या कसलेल्या नायकासारखी असते. त्यामुळे विराटनंतर रोहितकडे संघाचं नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे.

२) दुसरा पर्याय – लोकेश राहुल

याव्यतिरीक्त लोकेश राहुल हा आणख एक खेळाडू कर्णधारपदासाठी शर्यतीत आहे. आयपीएलमध्ये राहुल पंजाबच्या संघाचं कर्णधारपद भूषवतो. त्याच्या नेतृत्वात पंजाबच्या संघाने केलेल्या कामगिरीचं कौतुक झालं आहे. राहुलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव नसला तरीही त्याने कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही संघात आपलं स्थान पक्क केलंय. त्यामुळे भविष्यात बीसीसीआय राहुलच्या नावाचाही कर्णधारपदासाठी विचार करु शकते.

कर्णधारपद सोडण्याच्या Virat Kohli च्या निर्णयावर Jay Shah म्हणतात…

    follow whatsapp