WCL India Champions vs Pakistan champions final match : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये कट्टरप्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची वाट पाहणाऱ्या टीम इंडियाच्या क्रिकेट फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारत (India Champions) पाकिस्तान (Pakistan champions) हे दोन्ही बलाढ्य संघ पुन्हा एकदा मैदानात हा भिडणार आहेत. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागली आहे. पण हा सामना नेमका कधी आहे? आणि कोणत्या मैदानावर खेळवला जाणार आहे? हे जाणून घेऊयात. (wcl india champions vs pakistan champions final match edgbaston in birminggam world champions of legend 2024)
ADVERTISEMENT
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्सच्या फायनल सामन्यात भिडताना दिसणार आहेत. हा फायनल सामना आज खेळवला जाणार आहे. आज रात्री 9 वाजता एजबॅस्टन बर्मिंगहॅममध्ये रात्री 9 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट फॅन्सना लागली आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "जयंत पाटलांचा उबाठाने ठरवून पराभव केला", शेलारांची 'पोस्ट'
ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये एन्ट्री
फायनल गाठण्यासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. पण कर्णधार युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्सच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारताची पाकिस्तानशी लढत होणार आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 255 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ब्रेट लीच्या ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 7 गडी गमावून 168 धावाच करता आल्या आणि भारताने हा सामना 86 धावांनी जिंकला होता.
कसा रंगला सामना
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 बाद 254 धावा केल्या. खराब सुरुवातीनंतर उथप्पा, युवी आणि पठाण ब्रदर्सने डावाची धुरा सांभाळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कोंडी केली. अंबाती रायुडू आणि सुरेश रैनाच्या रूपाने भारताने 4.4 षटकांत 56 धावांत दोन गडी गमावले. रायुडू 14 धावा करू शकला तर रैनाला फक्त 5 धावा करता आल्या. यानंतर सलामीवीर उथप्पाने 35 चेंडूत 65 धावा करत धावसंख्या 100 च्या पुढे नेली.
हे ही वाचा : Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज!
उथप्पा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार युवी आणि पठाण ब्रदर्सने कहर केला. युवराजने 28 चेंडूंत चार चौकार व पाच षटकारांसह 59 धावा, युसूफ पठाणने 23 चेंडूंत चार चौकार व चार षटकारांसह नाबाद 51 धावा तर इरफान पठाणने 19 चेंडूंत 3 चौकार व पाच षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पीटर सीडलने 4 षटकात 57 धावा देत 4 बळी घेतले होते.
255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिले दोन झटके धवल कुलकर्णीने 30 धावांच्या आतच दिले. त्याने शॉन मार्श आणि बेन डंक यांची शिकार केली. यानंतर पवन नेगी, इरफान पठाण, हरभजन सिंग आणि राहुल शुक्ला यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. नेगीने 4 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले, तर शुक्ला, हरभजन आणि इरफानने प्रत्येकी एक यश मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून टीम पेनने सर्वाधिक 40 धावा केल्या. तो नाबाद राहिला. तर नॅथन कुल्टरने 13 चेंडूत 30 धावा केल्या.
ADVERTISEMENT