विराट कोहलीचा भारतीय संघ १८ जूनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्य़ासाठी मैदानात उतरणार आहे. भारतासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप स्पर्धेत काही ठराविक अपवाद सोडले तर भारताचा प्रवास चांगला झाला आहे. १८ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
परंतू साऊदम्पटनची खेळपट्टी, तटस्थ मैदानावर न्यूझीलंडसारखा प्रतिस्पर्धी या गोष्टी लक्षात घेता अंतिम ११ चा संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अंतिम ११ चा संघ निवडताना दोन पेच कायम असणार आहेत.
WTC Final : भारतीय संघाची घोषणा, रोहितसोबत युवा शुबमन गिलला सलामीला संधी
पहिला पेच – भारताच्या Pace Trio मध्ये कोणाला मिळणार संधी?
१५ जणांच्या संघात भारताने जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे. परंतू या बॉ़लर्सपैकी तिघांनाच अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे भारताचं सर्वात अनुभवी त्रिकुट मानलं जातं. आतापर्यंत या त्रिकुटाने भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत.
परंतू ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान इशांतचं दुखापतीमधून न सावरणं आणि मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर जाणं अशा स्थितीत शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि टी. नटराजन या नव्या गोलंदाजांनी भारताची बेंच स्ट्रेंथ किती चांगली आहे हे दाखवून दिलं. इशांत, शमी यांचं पुनरागमन झाल्यामुळे भारत महत्वाच्या सामन्यात बुमराहसोबत या दोन्ही खेळाडूंना संधी देऊन अनुभवी त्रिकुट मैदानावर उतरवण्याची शक्यता आहे.
दुखापतीमधून सावरल्यानंतर इशांत शर्माचा फारसा सराव झालेला नाहीये. त्यातच युवा मोहम्मद सिराजनेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट सरप्राईज पॅकेज म्हणून सिराजचाही अंतिम ११ साठी विचार करु शकतं.
मानाची गदा, कोट्यवधींचं इनाम; WTC Final जिंकणाऱ्या संघासाठी ICC कडून बक्षीस जाहीर
दुसरा पेच – आश्विन की जाडेजा किंवा आश्विन-जाडेजा दोघांनाही संधी?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली पहिली टेस्ट मॅच खेळून माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने दुसऱ्या टेस्टपासून रविंद्र जाडेजाला संधी देण्याचं ठरवलं. अष्टपैलू म्हणून संघात निवड केल्यामुळे भारतीय संघाला जाडेजाचा फलंदाजीतही चांगला फायदा झाला. जाडेजानेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत बॉक्सिंग डे टेस्टमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत महत्वाच्या विकेट घेतल्या. त्यातच जाडेजाला संघात स्थान दिल्यामुळे टीम इंडियाला एक अधिकचा बॉलिंग ऑप्शन तयार होतो.
इंग्लंडच्या भारत दौऱ्यात जाडेजाला दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्याच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने भारताचा किल्ला लढवला. परंतू जाडेजाचं आता संघात पुनरागमन झाल्यामुळे त्याच्या सहभागाबद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू या गोष्टीच एक छोटीशी मेख आहे. गेल्याकाही मालिकांपासून ऋषभ पंत ज्या पद्धतीने खेळतो आहे ते पाहता भारतीय संघाला सध्या मधल्या फळीतल्या फलंदाजीची चिंता नाहीये. अशा परिस्थितीत जर भारताने अधिकचा बॉलर खेळवायचं ठरवलं नाही तर जाडेजाचा पत्ता कट होऊन हनुमा विहारीचा विचार केला जाऊ शकतो.
जर भारतीय संघाने हनुमा विहारीचा संघात समावेश केला तर रविचंद्रन आश्विन किंवा जाडेजापैकी एकालाच संघात संधी देता येणार आहे. अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंट जाडेजाला संधी देतं की आश्विनला, की दोघांनाही संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
WTC Final : विराट विरुद्ध विल्यमसन, आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणाची आकडेवारी सरस?
ADVERTISEMENT