Thane : कळव्यातील ‘त्या’ रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT
Kalwa hospital news : कळव्यातील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात खळबळ उडाली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर 5 तास आयसीयूमध्ये उपचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
ADVERTISEMENT
ठाणे महापालिकेचे कळव्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. हे रुग्णालय रुग्णांच्या मृत्युमुळे चर्चेत आले आहे. मिळालेल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वेगवेगळ्या वार्डातील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 13 रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत होते. तर 4 रुग्ण हे सामान्य वार्डात उपचार घेत होते.
…तर हे घडलं नसतं, आव्हाड संतापले
17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे. “आज (13 ऑगस्ट) सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
वाचा >> ह्रदयद्रावक! ‘खिशात 1000 रुपये आहेत, अंत्यसंस्कार करा’, चंद्रपूरमध्ये घरातच घेतला फास
आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.
आज… pic.twitter.com/7mAhAnOJiL
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 13, 2023
मनसे नेते अविनाश जाधव एकनाथ शिंदेंवरच भडकले
या घटनेवर बोलताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले, “ठाण्यातील ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्या आधी पाच लोकांचा झाला होता. त्याच्या आदल्या दिवशी सहा लोकांचा झाला होता. कळवा रुग्णालयात लोकांनी जीव वाचवण्यासाठी जायचं की, मृत्यूच्या दारात जाण्यासाठी जायचं, हेच आम्हाला कळत नाही. मुख्यमंत्री ठाण्यातील आहेत. असं असतानाही ठाण्याची ही अवस्था आहे. तुमच्याच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गरीब लोक मरत असतील, तर काय उपयोग काय?”, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.
ADVERTISEMENT
“कळवा रुग्णालयात जाणारा माणूस हा झोपडपट्टी, चाळीत राहणारा आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत, असा माणूस कळवा हॉस्पिटलला जातो. जर गोरगरीब जनता अशा प्रकारे मरत असेल, तर अशा मुख्यमंत्र्यांची ठाण्याला गरज नाही”, असा संताप जाधव यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
वाचा >> “पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता तर कानशिल लाल केले असते”
जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनाही सुनावलं आहे. ते म्हणाले, “आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत”, अशी भूमिका आव्हाडांनी मांडली.
11 ऑगस्ट रोजी पाच रुग्णांचा झाला होता मृत्यू
याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 11 ऑगस्ट रोजी एका दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. रुग्णालय प्रशासनाकडून वेळेवर उपचार केले न गेल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मयत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता.
धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर 5 तास आयसीयूमध्ये उपचार करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून जितेंद्र आव्हाडांनीही रुग्णालयात जाऊन प्रशासनाला झापले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT