Crime : उज्ज्वल-नीलूचा पर्दाफाश! मॉडेलसोबत कसं करायचे 3-4 तास पॉर्न शूटिंग? शेजाऱ्यांनी सगळंच सांगितलं
Noida Porn Racket : नोएडामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करून पॉर्न साईट्सला कंटेट पुरवणाऱ्या उज्ज्वल किशोर आणि त्याची पत्नी नीलू श्रीवास्तवला अटक करण्यात आलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नोएडात पॉर्न रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश?

मॉडेल्सला त्या ठिकाणी बोलवून पॉर्न शूटिंग केलं जायचं

पॉर्न रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर
Noida Porn Racket : नोएडामध्ये अश्लील व्हिडीओ शूट करून पॉर्न साईट्सला कंटेट पुरवणाऱ्या उज्ज्वल किशोर आणि त्याची पत्नी नीलू श्रीवास्तवला अटक करण्यात आलीय. याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केलीय. नोएडाच्या सेक्टर 105 मधील एका घरात ईडीने छापा टाकून मोठं पॉर्न रॅकेट उघडकीस आणलं. अश्लील व्हिडीओ तयार करून कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या उज्ज्व-नीलूला पोलिसांनी अटक केलीय. या आरोपींनी आतापर्यंत 400 हून अधिक मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ शूट केले होते.
कसं सुरु होतं पॉर्न रॅकेट?
उज्ज्वल किशोर आणि त्याची पत्नी नीलू श्रीवास्तव सबडिजी नावाची एक कंपनी चालवत होते. ही कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मॉडेल्सला ऑडिशनच्या बहाण्याने बोलवत होती. त्यानंतर जबरदस्ती त्यांचे पॉर्न व्हिडीओ शूट केले जात होते. या रॅकेटमध्ये हाफ फेस शो, फुल फेस शो आणि न्यूडसारख्या पाच कॅटेगरीत शूटिंग केली जात होती. एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जवळपास 4 तास लागत होते आणि मॉडेल्सला पैशांचं लालच दाखवून हे धक्कादायक कृत्य करण्यास भाग पाडलं जात होतं.
हे ही वाचा >> अमित शाहांसमोरच भर सभागृहात Asaduddin Owaisi नी फाडला 'तो' कागद, असं काय होतं त्यात?
उज्ज्वल आणि नीलूच्या शेजाऱ्यांना या रॅकेटबाबत काहीही माहित झालं नाही. कारण पॉर्न रॅकेट गुपचूपपणे केलं जात होतं. आरोपी दाम्पत्याच्या घरीच दररोज सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान मॉडेल्स येत होत्या आणि 3-4 तासांनंतर तिथून निघून जायच्या. आरोपी याआधी विदेशात राहत होते. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला नाही.
ईडीचा तपास सुरु
अंमलबजावणी संचनालय आता या रॅकेट संबंधीत बँक खाते आणि मोबाईल डेटाची कसून तपासणी करत आहे. या पॉर्न रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परकीय निधीची माहिती गोळा करणाऱ्या ईडी पथकाला अलीकडेच माहिती मिळाली होती की, नोएडामध्ये एक टोळी सक्रिय आहे जी पॉर्न साइट्ससाठी सामग्री पुरवून परदेशातून निधी मिळवत आहे. यानंतर ईडीच्या पथकाने छापा टाकला. पथकाने कंपनीचे संचालक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांना अटक केली आणि त्यांना दिल्लीला नेले.