Viral Video : बायकोशी केलं भांडण! नवऱ्याने थेट समुद्रातच थांबवली बोट, पुढे जे घडलं...

मुंबई तक

Husband-Wife Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कपल बोट रायडिंगचा आनंद लुटत आहेत.

ADVERTISEMENT

Husband-Wife Viral Video
Husband-Wife Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने समुद्रातच बोट थांबवली

point

पती-पत्नीच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

point

नेमकं घडलं तरी काय?

Husband-Wife Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कपल बोट रायडिंगचा आनंद लुटत आहेत. परंतु, पती-पत्नीत काही आलबेल नसल्याने पतीने अचानक खोल समुद्रात बोट थांबवली. पत्नीसोबत झालेलं भांडण सोडवण्यासाठी पतीने चक्क समुद्रात बोट थांबवून अनोखा उपाय शोधला. पतीने पत्नीसोबत झालेलं भांडण मिटवण्यासाठी असं काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. 

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, पतीने समुद्रात बोट अचानक थांबवली आणि पत्नीशी संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पत्नीने होकार द्यावा यासाठी पतीने खूप प्रयत्न केल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पतीने केलेलं भन्नाट कृत्य पाहून अनेकांना हसू आल्याशिवाय राहणार नाही. इतकच नाही तर पतीने पत्नीकडे आगळ्यावेगळ्या मागण्याही केल्या आहेत. पत्नीशी भांडण झाल्यानंतर पतीने अनोखी शक्कल लढवली. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

हे ही वाचा >> अमित शाहांसमोरच भर सभागृहात Asaduddin Owaisi नी फाडला 'तो' कागद, असं काय होतं त्यात?

इंस्टाग्राम यूजर आरुषी त्रिवेदीने (@arushi.tri) हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, अखेर त्यांना माफी मागावी लागली. जेणेकरून बोट पुन्हा सुरु झाली. जर समुद्राच्या मधोमध एका बोटमध्ये एक दोन व्यक्ती असतील आणि लाईफगार्ड नसेल. अशावेळी फक्त माफी मागा आणि पुढे जा.

इथे पाहा पती-पत्नीचा व्हायरल व्हिडीओ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arushi Trivedi (@arushi.tri)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, भावाने संधी पाहिली आणि याचा योग्य पद्धतीने वापर केला. दुसऱ्या यूजरने म्हटलं, अचानक 15 वर्षांनंतर बोट्सची बुकिंग होणार आहे. कारण आता प्रत्येक पती पत्नीला त्यांच्यातील भांडण अशाप्रकारे मिटवायचं आहे. एका अन्य यूजरने म्हटलं, हा व्यक्ती जर अचानक गायब झाला, तर आम्हाला माहितीय की कारण काय असेल. तसच अन्य एकाने म्हटलं, भाऊ एक सच्चा लिजेंड आहे. त्याने तेच केलं जे आम्ही कधी विचार करू शकलो नाही, ते ही खूप प्रेमळ अंदाजाने.

हे ही वाचा >> 3rd April 2025 Gold Rate : एप्रिल फूल नव्हे! सोनं खरंच झालं स्वस्त, मुंबईसह 'या' शहरांत सोन्या-चांदीचे भाव घसरले

पतीने अनोख्या पद्धतीने पत्नीसोबत झालेलं भांडण मिटवलं. पण या मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेट यूजर्सची मनंही जिंकली आहेत. कधी कधी जीवनात थोड्या मजेशीर घटना घडल्या पाहिजेत. खासकरून जेव्हा तणावपूर्ण स्थिती असेल. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी त्यांचं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं आहे. पती-पत्नीत झालेलं भांडण मिटवण्याची ही योग्य पद्धत नाही, असं या लोकांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp