Israel Palestine Crisis: इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री बेपत्ता! सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Actress Nushrratt Bharuccha stuck in Israel-Palestine Crisis and now There is no contact
Actress Nushrratt Bharuccha stuck in Israel-Palestine Crisis and now There is no contact
social share
google news

Israel-Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूडमधूनही (Bollywood) अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नुशरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या टीममधील एका व्यक्तीने ही माहिती शेअर करून याचा दुजोरा दिला आहे. (Actress Nushrratt Bharuccha stuck in Israel-Palestine Crisis and now There is no contact)

ADVERTISEMENT

बेसमेंटमध्ये घेतला आसरा? संपर्कही तुटला…

मीडियासोबत शेअर केलेल्या माहितीत तिच्या टीममधील व्यक्तीने सांगितले की, ‘नुशरत भरूचा इस्राईलमध्ये अडकली आहे. ती हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी तिथे गेली होती. तिच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार आज दुपारी 12.30 च्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. यावेळी ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती.’

’25 लोक पाकमधून आलेत, बॉम्बस्फोट करणार…’, मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या!

सुरक्षा उपायांसाठी अधिक माहिती उघड करण्यात आलेली नाही. मात्र, तेव्हापासून तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. ‘टीमने सांगितले की, आम्हाला तिच्याशी संपर्क साधता येत नाही आहे. आम्ही नुशरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आशा आहे की ती निरोगी आणि सुरक्षित परतेल.’ जर नुशरत भरूचा लवकर सापडली नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत घेतली जाऊ शकते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चित्रपटाची कहाणी नुशरतच्या आयुष्यात खरी ठरली!

आत्ताच ऑगस्ट महिन्यात अभिनेत्री नुशरत भरुचाचा ‘अकेली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे कथानक असे आहे की एक मुलगी काही कारणाने इराकच्या युद्धात अडकते. हा चित्रपट युद्धाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे.

Nitin Gadkari: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’, नितीन गडकरींवर सिनेमा; कोणी साकारली भूमिका?

नुसरतने इंस्टाग्रामवर ट्रेलर व्हिडीओ अपलोड करून चाहत्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, ‘एकटी (अकेली) – जीव वाचवण्यासाठी एका साध्या मुलीची लढाई. नुशरत भरुचाचा चित्रपट युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकलेल्या एका भारतीय मुलीबद्दल आहे आणि ती सर्व प्रतिकूल परिस्थितींमध्ये टिकून राहण्यासाठी कशी धडपड करते यावर आधारित आहे.’

ADVERTISEMENT

Sharad Pawar: ‘…हे घटनात्मक पाप आहे’, पवार गटाचा राहुल नार्वेकरांवर मोठा आरोप

इस्रायल आणि हमास यांच्यात भयानक युद्ध

शनिवारी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट सोडले. या हल्ल्यात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवल्याचा दावा हमासने केला आहे. अनेक इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचीही माहिती आहे. इस्त्राईच्या प्रतिहल्ल्यात 198 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 1,500 जखमी झाले. हमासने संपूर्ण नियोजनासह इस्त्राईलला लक्ष्य केले, ज्यासाठी ते बऱ्याच काळापासून तयारी करत होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT