10 वीची परीक्षा पास होण्यासाठी 500 रुपये आणि... विद्यार्थ्यांचे कारनामे पाहून शिक्षकही हैराण

मुंबई तक

21 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत कर्नाटक एसएसएलसी (10 वी) च्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी फक्त उत्तरच नव्हे तर पैसे, लव्ह लेटर आणि भावुक पद्धतीने विनंती केल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

उत्तरपत्रिकेत लाच देण्यासाठी ठेवले 500 रुपये तर लिहिलं लव्ह लेटर
उत्तरपत्रिकेत लाच देण्यासाठी ठेवले 500 रुपये तर लिहिलं लव्ह लेटर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

point

बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत 500 रुपये ठेवून लाच देण्याचा प्रयत्न

point

उत्तरपत्रिकेत उत्तरांऐवजी लिहिली लव्ह स्टोरी

बंगळुरू: 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. 21 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत कर्नाटक एसएसएलसी (10 वी) च्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, निकालाच्या आधी कर्नाटक बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कारण, उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी फक्त उत्तरच नव्हे तर पैसे, लव्ह लेटर आणि भावुक पद्धतीने विनंती केल्याचं दिसत आहे.

कर्नाटकातील चिक्कोडी येथे दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणारे काही शिक्षक तसेच परीक्षेचे निरीक्षण करणारे लोक हसत होते तर काहींनी डोक्यालाच हात लावला.

उत्तरपत्रिकेत 500 रुपये ठेवून लाच देण्याचा प्रयत्न

एका विद्यार्थ्याने तर चक्क त्याच्या उत्तरपत्रिकेत 500 रुपयांची एक नवी कोरी नोट ठेवली आणि त्यात लिहिले, "प्लीज सर, मला पास करा." आता ही मस्करी होती, धाडस होते की शेवटची आशा? हे फक्त त्या विद्यार्थ्यालाच माहीत. पण हे पाहून शिक्षक तर खूप हसायला लागले.

"माझं प्रेम तुमच्या हातात आहे, प्लीज मला पास करा"

कर्नाटकातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला पास होण्याचे असे कारण दिले की शिक्षकही ते पाहून आश्चर्यचकित झाले. त्या विद्यार्थ्याला त्याची मैत्रीण त्याला सोडून जाईल किंवा कदाचित पुढच्या वर्गात जाईल, या कारणामुळे पास व्हायचे आहे! विद्यार्थ्याने त्याच्या उत्तरपत्रिकेत लिहिले, "माझे प्रेम तुमच्या हातात आहे, प्लीज मला पास करा."

हे ही वाचा: Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगर सांगितलं हादरवून टाकणारं सत्य

चहा- पाण्यासाठी पैसे देऊन दिली लाच

एका विद्यार्थ्याने अगदी स्टाईलिश पद्धतीने लाच देण्याचा प्रयत्न केला. एकाने 500 रुपयांच्या नोट ठेवली आणि लिहिले, "सर, या पैशातून चहा प्या आणि मला पास करा." दुसऱ्या एका विद्यार्थ्याने भविष्यासाठी एक वचनही दिले, "जर तुम्ही मला पास केले तर मी तुम्हाला आणखी जास्त पैसे देईन." आता हे ऐकून शिक्षक काय विचार करत असतील, हे फक्त त्यालाच माहीत. एका विद्यार्थ्याने तर भावुक पद्धतीने लिहिले, "जर तुम्ही मला पास केलं नाही तर आई आणि बाबा मला कॉलेजमध्ये पाठवणार नाहीत." 500 रुपयांसोबत अशी विनंती पाहून शिक्षकसुद्धा विचार करत असतील.

सोशल मीडियावर उत्तरपत्रिका व्हायरल

उत्तरपत्रिकेचे हे मजेशीर किस्से आता सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. लोक या विद्यार्थ्यांच्या धाडसाचं आणि क्रिएटिविटीचं कौतुक करत आहेत आणि त्यांची खिल्लीही उडवत आहेत. काही लोक विचारत आहेत, "या मुलांना खरोखर वाटले होते का की शिक्षक त्यांना पैशाच्या किंवा प्रेमपत्रांच्या बदल्यात पास करतील? की परीक्षेचा ताण कमी करण्याचा हा एक मार्ग होता?"

हे ही वाचा: 14 व्या वर्षीच IPL खेळला अन् पहिल्याच चेंडूत सिक्स; Google CEO ला चकित करणारा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?

असं यापूर्वीही घडलं होतं

हे असं पहिल्यांदाच घडलं नाही, तर गेल्या महिन्यात मध्य प्रदेशात काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये "मोफत जेवण" आणि "पक्की मैत्री" असे ऑफर देऊन परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न केला. 2021 मध्ये, उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने तर उत्तरपत्रिकेत नोटमध्ये लिहिलं होतं, "मला पास करा, नाहीतर संपूर्ण वर्ग नापास होईल." पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात, विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत उत्तरांऐवजी डूडल, स्क्रिबल आणि अगदी प्रेमकथा देखील लिहिल्या. एका विद्यार्थ्याने त्याच्या विज्ञानाच्या उत्तरपत्रिकेला डायरीत बनवले आणि त्यात एक संपूर्ण प्रेमकथा लिहिली. मात्र, या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम झाला नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp