कामाची बातमी: पासपोर्टच्या नियमांमध्ये झाले 'हे' बदल, नक्की जाणून घ्या नाहीतर...
नवीन पासपोर्ट बनवण्याचा विचार करणाऱ्यांना आज आम्ही यासंबंधित नवीन अपडेट्स सांगणार आहोत. 2025 मध्ये पासपोर्टच्या नियमांमध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पासपोर्टच्या नियमांमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?

2025 च्या पासपोर्ट नियमांमधील नवीन बदल

पासपोर्टमधील नवीन नियमांमध्ये काय नमूद?
Passport New Rules: जर तुम्हीसुद्धा पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल, तर यावर्षीचे पासपोर्ट संबंधित नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नुकतंच, भारत सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे पासपोर्टचे नवीन बदल कोणते? तसेच त्यांच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
पासपोर्ट नियमांमध्ये कोणते बदल झाले?
जन्म प्रमाणपत्र आवश्यक
1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्म प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. यापूर्वी, जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला, आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे देखील वैध होती, परंतु आता फक्त जन्म प्रमाणपत्रच स्वीकारले जाणार आहे.
पासपोर्ट (सुधारणा) नियम 2025 हे डिजिटल आणि सुरक्षित ओळख दाखवण्याच्या दिशेने उचललेलं एक मोठे पाऊल आहे. नवीन नियमांमुळे काही लोकांना अतिरिक्त कागदपत्रे गोळा करण्यात अडचणी येऊ शकतात, परंतु हे दीर्घकाळ डेटा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल.
पासपोर्टच्या शेवटच्या पानावर 'ही' माहिती नसेल
1. आता अर्जदाराचा मूळ पत्ता पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापला जाणार नाही.
2. ही माहिती पासपोर्टमध्ये असलेल्या बारकोडद्वारे डिजिटल पद्धतीने उपलब्ध होईल.
3. माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हे ही वाचा: Maharashtra Weather : पुणे, सातारा, सोलापूरमध्ये उष्णतेच्या झळा! आज तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
पासपोर्टमधील बदलांचा काय परिणाम होईल?
- नवीन अर्जदारांसाठी आव्हान: जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला प्रथम ते घ्यावे लागेल, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया थोडी लांबवू शकते.
- पत्त्याची गोपनीयता: पासपोर्टवर पत्ता छापला जाणार नसल्यामुळे वैयक्तिक माहितीची सुरक्षितता वाढेल.
- डिजिटल प्रक्रियेला चालना: पासपोर्ट सेवा अधिक डिजिटल आणि सुरक्षित करण्यासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
यासाठी काय करावे लागेल?
1. जर तुमचा जन्म 1 ऑक्टोबर 2023 नंतर झाला असेल, तर आताच तुमचा जन्माचा दाखला बनवून घ्या.
2. तुमचा पासपोर्ट अपडेट करण्यासाठी नवीन डिजिटल प्रक्रियांबद्दल जागरूक रहा.
3. कोणत्याही बदलांसाठी किंवा नवीन माहितीसाठी पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटवरील अपडेट्स तपासा.
हे ही वाचा: Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात टाका हळद, झटपट जमेल तुमचं लग्न!
आता पासपोर्टसाठी 'ही' कागदपत्रे अनिवार्य
- जन्म प्रमाणपत्र (1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्यांसाठी)
- ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड)
- नागरिकत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जुना पासपोर्ट (जर तुमच्याकडे आधीच असेल तर)
- फोटो आणि बायोमेट्रिक पडताळणी