ISRO ची ऐतिहासिक कामगिरी! ‘आदित्य एल1’ पोहोचले निश्चित स्थळी, PM मोदी काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Aditya l1 reached solar halo orbit : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रोने) नवीन वर्षात इतिहास रचला आहे. इस्त्रोची पहिली सूर्य मोहिम शनिवारी लँग्रेज पॉईंटवर दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून इस्त्रोच्या कामगिरीचे अभिनंदन केले आहे. भारताने आणखीण एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य L1च्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात जटिल अंतरळात मोहिमांपैकी एक हि मोहिमेत आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे. हा अथक समर्पणाचा दाखला आहे. या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्यात मी माझ्या देशवासियांसोबत सहभागी आहे. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पार करत राहू, असेही मोदी म्हणाले. (aditya l1 reached destination isro inserted it in solar halo orbit india first sun mission pm narendra modi)

ADVERTISEMENT

आदित्य उपग्रह L1 पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आता पृथ्वीपासून भारतातील पहिल्या सौर वेधशाळेचे अंतर 15 लाख किमी आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेला आदित्यचा प्रवास संपला आहे. 400 कोटी रुपयांचे हे मिशन आता भारतासह संपूर्ण जगाच्या उपग्रहांचे सौर वादळांपासून संरक्षण करेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : राऊतांना बाळासाहेब म्हणाले, ‘चुपचाप काम कर…’ निरुपमांनी सांगितला राज्यसभा निवडणुकीचा ‘तो’ किस्सा

आदित्यचा प्रवास 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाला. पाच महिन्यांनंतर, 6 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी, हा उपग्रह L1 पॉइंटवर पोहोचला. या बिंदूभोवतीचा सौर प्रभामंडल कक्षेत तैनात करण्यात आला आहे. आदित्य-L1 उपग्रहाचे थ्रस्टर्स हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यासाठी काही काळ चालू करण्यात आले. यात एकूण 12 थ्रस्टर्स आहेत. आता आदित्य सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या इतर चार उपग्रहांच्या गटात सामील झाला आहे. हे उपग्रह आहेत- WIND, Advanced Composition Explorer (ACE), डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी (DSCOVER) आणि NASA-ESA ची संयुक्त मोहीम SOHO म्हणजेच सौर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा.

ADVERTISEMENT

L1 पॉइंटवर ठेवणे आव्हानात्मक

आदित्यला L1 पॉइंटमध्ये टाकणे हे आव्हानात्मक काम होते. यामध्ये वेग आणि दिशा यांचा योग्य समन्वय आवश्यक होता. यासाठी इस्रोला त्यांचे अंतराळयान कुठे आहे हे जाणून घेणे आवश्यक होते. कुठून. अजून कुठे जाणार? अशा प्रकारे त्याचा मागोवा घेण्याच्या प्रक्रियेला ऑर्बिट डिटरमिनेशन म्हणतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मलंगगडावरून ओवैसींनी शिंदेंवर साधला निशाणा, तुम्हाला बाबरीमुळेचं…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT