22 वर्षीय तरुणीला घेऊन गेला OYO वर, गर्लफ्रेंड जोरजोरात ओरडत बाहेर पळाली! 38 वर्षांचा उमेश बाथरुममध्ये अन्...

मुंबई तक

OYO Hotel Viral News : नोएडाच्या एका ओयो हॉटेलमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकरणामुळे पोलिसांसह लोकांनाही हादरा बसला आहे. 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनियर उमेशने त्याच्या 22 वर्षांच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये एक रुम बुक केलं होतं.

ADVERTISEMENT

OYO Hotel Viral News
OYO Hotel Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उमेश आणि त्याच्या प्रेयसीसोबत OYO मध्ये काय घडलं?

point

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनाही बसला धक्का

point

उमेशची गर्लफ्रेंड रुममधून बाहेर आली अन् तितक्यात...

OYO Hotel Viral News : नोएडाच्या एका ओयो हॉटेलमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकरणामुळे पोलिसांसह लोकांनाही हादरा बसला आहे. 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनियर उमेशने त्याच्या 22 वर्षांच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये एक रुम बुक केलं होतं. पण काही वेळातच त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर त्याची प्रेयसी रुमबाहेर येऊन जोरजोरात ओरडली. 'मी बाथरूममध्ये होती, उमेशने गळफास घेतला', असं म्हणत तिने या खळबळजनक घटनेबद्दल हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परंतु, ही कहाणी वाटते तितकी सोपी नाही. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला, तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, उमेशचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर त्याच्या प्रेयसीला अटक केली. मृत उमेशची प्रेयसी बीबीएची विद्यार्थीनी आहे. नोएडाच्या एका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. याच तरुणीने उमेशला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले, अशा आरोप उमेशच्या कुटुंबियांनी केला आहे.

हे ही वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आज सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी घसरण, तुमच्या शहरात आजचे दर काय?

OYO हॉटेलमध्ये उडाली खळबळ

उमेश आणि त्याची प्रेयसी या दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. उमेश त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत होता. त्याचदरम्यान, एका डेटिंग अॅपवर उमेशची ओळख या तरुणीसोबत झाली. 10 एप्रिलला दोघेही सेक्टर 27 च्या ओयो हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर रुममध्ये दोघांमध्ये भांडण झालं. पाळीव श्वानाच्या उपचारावरून दोघांमध्ये वादविवाद झाल्याचं तरुणींचं म्हणणं आहे. त्यानंतर उमेशने आत्महत्या केली.

हे ही वाचा >> Zaheer khan झाला बाबा, लग्नाच्या 8 वर्षानंतर सागरिका घाटगेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवलं...

परंतु, मृताच्या कुटुंबाने दावा केला आहे की, उमेशने आत्महत्या केली नाही. तर हा एकप्रकारचा कट आहे. तरुणीसोबत दुसरा व्यक्ती होता, जो उमेशला फसवण्याचा प्रयत्न करत  होता, असाही आरोप उमेशच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, नोएडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. परंतु, ही गंभीर घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp