Aditya L1 मोहिमेत मोठं यश! SUIT ने पाठवलेले सूर्याचे 11 फोटो पाहिलेत का?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

aditya l1 suit payload capture full disk image sun in 11 different colours in near ultraviolet wavelengths isro
aditya l1 suit payload capture full disk image sun in 11 different colours in near ultraviolet wavelengths isro
social share
google news

Aditya L1 Suit Captures Full disk Image : चांद्रयान 3 मोहिमेनंतर आता आदित्य L1 (Aditya L1)  ने सुर्य मोहिमेत मोठे यश मिळवले आहे.आदित्य-एल1 वर लावण्यात आलेल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (SUIT) प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तब्बल 11 वेगवेगळ्या रंगांमध्ये सुर्य दिसणार आहे. ही सर्व चित्रे 200 ते 400 नॅनोमीटर तरंगलांबीची आहेत. आदित्य L1चे सर्वात मोठं यश आहे. (aditya l1 suit payload capture full disk image sun in 11 different colours in near ultraviolet wavelengths isro)

ADVERTISEMENT

आदित्य-L1 चा SUIT पेलोड 20 नोव्हेंबर 2023 रोजी सक्रिय झाला. हा SUIT जवळच्या अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीमध्ये सूर्याच्या पूर्ण-डिस्क प्रतिमा कॅप्चर करते. या दुर्बिणीने सूर्यप्रकाशातील फोटोस्फियर आणि क्रोमोस्फिअरचा फोटो घेतला आहे. फोटोस्फियर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फियर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग आणि बाह्य वातावरणातील कोरोना यांच्यामध्ये असलेला पातळ थर. क्रोमोस्फियरचा विस्तार सूर्याच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटरपर्यंत आहे.

हे ही वाचा : NIA ISIS : ठाणे, पुण्यासह 41 ठिकाणी एनआयएच्या धाडी, 13 जणांना अटक; प्रकरण काय?

SUIT ने प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क छायाचित्रे घेतली आहेत. ही सर्व चित्रे 200 ते 400 नॅनोमीटर तरंगलांबीची आहेत. म्हणजेच तुम्हाला सूर्य 11 वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसत आहे. सूर्याचा फोटो 6 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता. पण ती पहिली प्रकाश विज्ञान प्रतिमा होती. पण यावेळी फुल डिस्क फोटो घेण्यात आला आहे. म्हणजेच सूर्याच्या त्या भागाचा फोटो जो पूर्णपणे समोर आहे. या चित्रांमध्ये, डाग, प्लेग आणि सूर्याचे शांत भाग दृश्यमान आहेत. या छायाचित्रांच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा योग्य अभ्यास करू शकणार आहेत.

हे वाचलं का?

पुण्याचे इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE), सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडिया (CESSI), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर वेधशाळा, तेजपूर विद्यापीठ आणि ISRO च्या शास्त्रज्ञांनी मिळून हे SUIT बनवले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nawab Malik : “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT