Dindigul Hospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20 पेक्षा जास्त रुग्णांना..

मुंबई तक

खासगी रुग्णालयाला लागेल्या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. रुग्णालयामध्ये आग लागली तेव्हा उपचारासाठी  आलेल्या रुग्णांची मोठी संख्या तिथे होती अशी माहिती आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खासगी रुग्णालयाला भीषण आग

point

आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेनं देश हादरला आहे. रुग्णालयाला लागेल्या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. रुग्णालयामध्ये आग लागली तेव्हा उपचारासाठी  आलेल्या रुग्णांची मोठी संख्या तिथे होती अशी माहिती आहे. आग लागल्यानंतर लगेचच उर्वरीत रुग्णांना तात्काळ तिथून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र, त्यापूर्वी 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

 

हे ही वाचा >> Mumbai Crime News : वासनांध प्रवाशनं थेट टॅक्सीमध्येच महिलेसमोर सुरू केलं... ग्रँट रोड परिसरातील चीड आणणारी घटना

 

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या या घटनेनंतर 29 रूग्णांना शासकीय रूग्णालयात तसंच जवळच्या इतर खाजगी रूग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. तर बचावकार्य वेगानं सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत एकही व्यक्ती आत अडकून राहू नये यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

रात्री दहाच्या सुमारास घडली घटना

 

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केलं. काही वेळाने जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहोचले आहेत. अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.दिंडीगुलचे जिल्हाधिकारी एम.एन.पुंगोडी यांनी सांगितलं की, रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. तसंच डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरच मृतांचा आकडा जाहीर केला जाणार आहे. तरी या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये रुग्ण आणि नातेवाईकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp