आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रु. दंड, 'या' गावाचा नवा नियम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास 500 रु. दंड
आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास 500 रु. दंड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाचा अनोखा ठराव

point

आई-बहिणीवरून शिवी दिल्यास ठोठावणार दंड

point

महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतीचा निर्णय

रोहित वाळके, नेवासा: महाराष्ट्रातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी एक अनोखे आणि चांगलं पाऊल उचलण्यात आलं आहे. महिलांवरून शिवीगाळ करणाऱ्यांना आता 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायतीने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा नियम एकमताने मंजूर करण्यात आला. (rs 500 fine for abusing words regarding mother and sisters a unique rule made in saundala village ahilyanagar of maharashtra)

ADVERTISEMENT

महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी घेतला निर्णय

महिलांचा स्वाभिमान वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायत सरपंच शरद अडागळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान सर्वोतोपरी आहे. लोकांनी गैरवर्तन करण्यापूर्वी विचार करावा आणि त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवावे म्हणून हा नियम पारित करण्यात आला.'

हे ही वाचा>> दिल्लीत नवा डाव, अमित शाह गेले शरद पवारांच्या घरी, 'ही' भेट अन् बरंच काही!

यापूर्वी 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे

या नियमांतर्गत ग्रामपंचायतीने यापूर्वीच 6 जणांना दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे गावात भांडणाचे प्रमाण कमी झाले असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे उपसरपंच गणेश अडागळे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Kurla Bus Accident Inside Video : अपघात घडल्यानंतर बसचालकाने नेमकं काय केलं? CCTV फुटेज आलं समोर

विधवा महिलांच्या सन्मानाचाही ठराव

यापूर्वीही गावात विधवा महिलांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आता प्रत्येक वाढदिवसाला विधवा महिलांना कार्यक्रमाचे उद्घाटन करून विशेष प्रसंगी ध्वजारोहणाचा मान दिला जातो.

या ठरावाचे गावातील महिलांनी स्वागत केले आहे. महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी हे पाऊल संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जावे, असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT