Sanjay Raut : राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक! राणे समर्थक म्हणाला, ‘…तर डोकं फुटलं असतं’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चपला फेकण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली. भाजप कार्यकर्ता आणि राणे समर्थकाने संजय राऊतांना लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
-विजयकुमार बाबर, सोलापूर
ADVERTISEMENT
Sanjay Raut News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर चप्पलफेक केल्याची घटना इंदापुरात घडली. त्यानंतर अशाच पद्धतीने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले. सोलापूर येथे एका कार्यक्रमातून परतत असताना संजय राऊत यांच्या गाडीवर चपला भरलेली पिशवी फेकण्यात आली. चपलांची पिशवी फेकणारा राणे समर्थक असल्याचे समोर आले आहे.
खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. तसेच इतर काही कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान, सायंकाळी संजय राऊत यांच्या हस्ते एका हॉटेलचे उद्घाटन होते. या कार्यक्रमानंतर परतत असताना नारायण राणे समर्थकाने राऊतांच्या गाडीला लक्ष्य केले.
हे वाचलं का?
संजय राऊतांच्या गाडीवर कुणी फेकल्या चपला?
खासदार राऊत यांच्या गाडीवर चपला फेकल्यानंतर त्या कार्यकर्त्याने नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आणि घटनास्थळावरून पसार झाला. चप्पलफेक करणाऱ्या कार्यकर्त्याने माध्यमांसमोर चप्पलफेक केल्याची जबाबादारी स्वीकारली आणि त्याची भूमिका मांडली.
हेही वाचा >> इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले
सागर शिंदे असे चपल फेकणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. तो राणे समर्थक असून, भाजपचा कार्यकर्ताही आहे. त्याने सांगितले की, “त्यांच्या चपला फेकण्याचं कारण असं होतं की, प्रत्येक ते विनाकारण नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे… या प्रत्येकांवर तोंडसुख घेण्याचे काम हा करतो.”
ADVERTISEMENT
राणे समर्थकाचा राऊतांना इशारा
“मराठा मोर्चा मुका मोर्चा म्हणून हिणवल्याचेही माझ्या मनात होतं. त्याच्यामुळे मी हे कृत्ये केले. आज मी त्यांच्या अंगावर चपला फेकल्या. मी जात असताना मला कळलं की, इथून संजय राऊत जात आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी जायला मला उशीर झाला. त्यामुळे मी पुलावरून स्वतः चपला फेकल्या”, असे शिंदेने सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसंच…”, जरांगेंना संताप अनावर
“इथून पुढे संजय राऊत मला कुठेही दिसू दे… आज मला चपला दिसल्या, जर भविष्यात चपला भेटल्या नाही, तर… त्या पुलावर चपला होत्या. दगड असते तर आज त्यांचं डोकं फुटलेलं असतं”, असे सागर शिंदेंने सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT