भरत गोगावले आदिती तटकरेंबद्दल असं काय बोलले की रोहित पवार भडकले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bharat gogawale controversy, rohit pawar slams after he's remarks about aditi tatkare.
bharat gogawale controversy, rohit pawar slams after he's remarks about aditi tatkare.
social share
google news

लेंMaharashtra Politics : खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाने वाद उभा राहिला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांसोबत घेऊन सत्तेत सामील झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची अडचण झाली आहे. आदिती तटकरे मंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद जाण्याची चर्चा सुरू झाल्याने भरत गोगावले यांनी अजब वक्तव्य केले. त्यामुळे रोहित पवार चांगलेच भडकले.

ADVERTISEMENT

अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आले आणि महायुती अस्तित्वात आली. पण, नव्या गड्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे. शिवसेनेतील आमदारांची नाराजीही लपून राहिलेली नाही. त्याचबरोबर मिळणाऱ्या जास्तीच्या मंत्रिपदावरही पाणी फेरलं गेलं आहे. अशात शिंदेंच्या सेनेतील अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. त्यांनी अनेकदा ही इच्छाही बोलून दाखवली असून, यात भरत गोगावलेंचाही समावेश आहे.

गोगावले आदिती तटकरेंबद्दल काय बोलले?

भरत गोगावलेंचं मंत्रिपदाबरोबरच लक्ष आहे ते रायगडच्या पालकमंत्रीपदावर. पण, आदिती तटकरे यांच्याकडे मंत्रिपद जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भरत गोगावलेंनी या पदावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली. त्यातच आता बोलताना गोगावलेंनी आदिती तटकरेंबद्दल एक विधान केलं.

हे वाचलं का?

वाचा >> एकनाथ शिंदेंचे खास, पण अजितदादांच्या एंट्रीनं होणार गेम, गादी जाणार?

गोगावले म्हणाले, “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं, तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण, त्यांच्या या विधानाने ते स्त्रियांना कमकुवत समजत असल्याची चर्चा सुरू झाली. यावरून रोहित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावलं.

गोगावलेंना रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवारांनी एक ट्विट केलं. ज्यात ते म्हणतात, “आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ आदितीताई तटकरे यांचाच अपमान झाला नाही, तर राज्यातील 6 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलाय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वाचा >> Exclusive: अजित पवार अमोल मिटकरींना महिन्याला 50 हजार का पाठवायचे?, मुंबई Tak वर मोठा खुलासा

रोहित पवारांनी पुढे म्हटलंय की, “पवार साहेबांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?”, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT