Pune Accident: पायलट होण्याआधीच काळाने घातली झडप! कार चालवताना 'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली अन्...
Pune Car Accident News: पुणे जिल्ह्यातील बारामती भिगवा रस्त्यावर भीषण अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 2 ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे जिल्ह्यातील बारामती भिगवा रस्त्यावर भीषण अपघात

दोन ट्रेनी पायलटचा मृत्यू! दोन जण जखमी

अपघात नेमका कसा घडला?
Pune Car Accident Latest News: पुणे जिल्ह्यातील बारामती भिगवा रस्त्यावर भीषण अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 2 ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. दक्षू शर्मा (21, दिल्ली) आणि आदित्य कांसे (मुंबई) अशी मृतांची नावं आहेत. तक चेष्टा बिष्णोई आणि कृष्णसून सिंह हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेले आणि अपघातात जमखी झालेले लोक एका विमान अकॅडमीत ट्रेनिंग घेत होते, अशी माहिती समोर आलीय.
अपघाताची माहिती मिळताच भिगवा पोलीस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना भिगवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
दारुच्या नशेत करत होते ड्रायव्हिंग?
प्राथमिक माहितीनुसार, चारही जण दारुच्या नशेत होते आणि कार वेगाने चालवत होते. गाडीचा वेग वाढल्यानं चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर कार पलटी झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा >> Uday Samant: "ईव्हीएममध्ये घोळ..."; विधानसभा अध्यक्षांची निवड होताच उदय सामंत 'हे' काय बोलून गेले
मिळालेल्या माहितीनुसार, चौघेही ट्रेनी पायलट सकाळी 2.30 ते 3.00 दरम्यान बारामतीच्या भिगवा येथे जात होते. रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे हा गंभीर अपघात झाला. पोलिसांनी मृत आणि गंभीर झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला या अपघाताबाबत माहिती दिलीय. या भीषण अपघातात दोन ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. दक्षू शर्मा (21, दिल्ली) आणि आदित्य कांसे (मुंबई) अशी मृतांची नावं आहेत. तक चेष्टा बिष्णोई आणि कृष्णसून सिंह हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.