Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story
bmc khichdi scam Latest news in marathi : मुंबई पोलिसांनी ज्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, तिचे भागीदार संजय मुशीलकर यांचे पुत्र आहेत. पण, एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेखच केलेला नाही.
ADVERTISEMENT
BMC Khichdi Scam Marathi : बृहन्मुंबई महापालिकेने कोविड लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांसाठी खिचडी वाटप योजना सुरू केली होती. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, माहिती अधिकार कायद्यातून स्फोटक माहिती समोर आली आहे. दि इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वर्तमानपत्रात याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बीएमसीच्या खिचडी घोटाळ्यात ज्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे, ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याची आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या कथित आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागितलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ज्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ती शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मालकीची आहे.
खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे शिंदेंच्या नेत्यापर्यंत?
माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या कंपनीचे नाव फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस (force on multi services) असून, एफआयआरमध्ये कंपनीच्या भागीदारांचे नावांचा कोणताही उल्लेख नाही. 8.64 कोटी रुपयांच्या या खिचडी घोटाळ्यातील ही कंपनी शिंदे गटाचे सरचिटणीस संजय मशीलकर यांची आहे. मशीलकर यांचे दोन्ही पुत्र प्रीतम आणि प्रांजल हे त्या कंपनीचे भागीदार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या FIR मध्ये काय?
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे अनोळखी भागीदार आणि कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि ठाकरे गटातील सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
परवाना नसताना फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने मिळवले कंत्राट
पोलिसांच्या एफआयआरनुसार खिचडी घोटाळ्यातील फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनी ही विटा आणि वाळू विक्री करते. त्याचबरोबर सुरक्षा सेवा पुरवण्याचे काम करते. या कंपनीकडे कंत्राटासाठी आवश्यक असणारा अन्न, औषध आणि आरोग्य विभागाचा परवानाही नाही. कंपनी बेकायदेशीरपणे कंत्राट मिळवले. इतकंच नाही, तर अन्न पदार्थ तयार करण्याचे आणि पुरवण्याचे कामही ही कंपनी करत नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> हिशोब तर द्यावाच लागेल! सोमय्यांचा BMC आयुक्तांवर गंभीर आरोप
फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंत्राट देण्यासाठी पात्र नसतानाही तेव्हाच्या बीएमसी सहाय्यक आयुक्तांनी (नियोजन) खिचडी वाटपाचे कंत्राट दिले. बीएमसीमध्ये प्रभाव असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंपनीने बेकायदेशीपणे हे कंत्राट मिळवले, असे एफआयआरमध्ये म्हटलेले आहे. या प्रकरणी त्यावेळच्या सहाय्यक आयुक्त संगीता हंसळे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे वृत्तात म्हटले आहे.
ADVERTISEMENT
संजय मशीलकर काय म्हणाले?
या प्रकरणावर बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे सरचिटणीस संजय मशीलकर यांनी म्हटलं आहे की, “या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही. कंपनीचे काम बघण्यासाठी मी त्यावेळी दोन लोकांना नियुक्त केले होते.”
हेही वाचा >> अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”
ज्यावेळी (२०२०) फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीला खिचडी वाटपाचे कंत्राट मिळाले, त्यावेळी बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मशीलकर हे शिवसेनेचे उपसचिव होते. शिवसेनेतील फुटीनंतर मशीलकर हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सेनेत दाखल झाले.
सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकरांना होती माहिती?
खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची चौकशी करण्यात आली आहे. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला कंत्राट मिळवून देण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रभाव टाकला, याबद्दल चौकशी केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे स्थलांतरीत मजुरांना ३०० ग्रॅम खिचडी द्यायची होती. पण, डब्यात फक्त १०० ग्रॅम खिचडीच भरली गेली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, खिचडी भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चौकशीत सांगितलं की, प्रत्येक डब्यात ३०० ग्रॅम ऐवजी १०० ग्रॅम खिचडीच भरली जात असल्याची माहिती कीर्तिकरांना होती.
फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला मिळाले ३.६४ कोटी
समोर आलेल्या माहितीनुसार बीएमसीने कंत्राटापोटी मशीलकर यांच्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीला ८.६४ कोटी रुपये दिले होते. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने त्यातील ४.२ कोटी स्नेहा केटरर्सला दिले, तर ८४ लाख रुपये गोल्डन स्टार बँक्वेट हॉलला दिले. यात कंपनीला ३.६४ कोटींचा नफा झाला.
ADVERTISEMENT