Mumbai : मुंबईत 14 व्या मजल्यावरून पडली तरूणी, घातपात, अपघात की टोकाचं पाऊल?

मुंबई तक

Mumbai Crime News: माटुंगा येथील हिंदू कॉलनीमध्ये असलेल्या टेक्नो हाईट नावाच्या 14 मजली इमारतीत ही घटना घडली. जना सेठिया असं मृत विद्यार्थीनीचं नाव असून, ती त्याच इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गगनचुंबी इमारतीवरुन पडली विद्यार्थीनी

point

14 व्या मजल्यावरुन कोसळल्यानं मृत्यू

point

गॅलरीतून पडली की टोकाचं पाऊल उचललं?

मुंबईतील माटुंगा परिसरात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय विद्यार्थीनीचा उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात पोलिस याला संशयास्पद मानत असून, ही आत्महत्या की अपघात याचा सर्वच बाजूने तपास करत आहेत.

हे ही वाचा >> माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरूणीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार, दोन वेळा करायला लावला गर्भपात

मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील हिंदू कॉलनीमध्ये असलेल्या टेक्नो हाईट नावाच्या 14 मजली इमारतीत ही घटना घडली. जना सेठिया असं मृत विद्यार्थीनीचं नाव असून, ती त्याच इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती.

विद्यार्थिनीने स्वतःहून उडी मारली की अपाघाताने पडली हे समजू शकलेलं नाही. ते जाणून घेण्यासाठी पोलीस इमारतीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.  सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा >> 'कुणाल कामराच्या हस्ते होणार पुलाचे उद्घाटन', मनसेच्या राजू पाटलांनी थेट लावला बॅनर

दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जना सेठिया ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. या इमारतीत ती आपल्या कुटुंबासह राहत होती. ती एखाद्या मानसिक तणावात होती का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मित्र, मैत्रिणींचीही चौकशी सुरू केली आहे.


हे वाचलं का?

    follow whatsapp