मोबाईल पाण्यात पाडल्याचा राग, 13 वर्षाच्या मुलाने थेट महिलेला दगडाने ठेचून संपवलं, 'त्या' प्रकरणाचा उलगडा
Jalna Crime: मीराबाई बोंडारे या आपल्या शेतातील काम पूर्ण करुन एका झाडाखाली विश्रांती घेत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीनं मिराबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालन्यातील अंतरवाली टेंभीमधील घटना

शेतात आराम करताना महिलेला दगड घालून संपवलं

आरोपी मुलगा फक्त 13 वर्षांचा
Jalna Crime News : जालन्यातील अंतरवाली टेंभीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीकडे लहान मुलांना मोबाइलचं व्यसन लागल्याचं आपण सध्या सगळीकडेच पाहतोय. पण अंतरवाली टेंभीमधील एका मुलानं मोबाईलसाठी थेट एका महिलेचा जीव घेतला आहे. 13 वर्षाच्या मुलानं रागाच्या भरात थेट एका 41 वर्षाच्या महिलेची हत्या केली आहे. जालन्यातील अंतरवाली टेंभीमध्ये ही घटना घडली.
हे ही वाचा >> Mumbai : मुंबईत 14 व्या मजल्यावरून पडली तरूणी, घातपात, अपघात की टोकाचं पाऊल?
घटना कशी घडली?
मीराबाई बोंडारे या आपल्या शेतातील काम पूर्ण करुन एका झाडाखाली विश्रांती घेत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीनं मिराबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.शेतात खून झाल्याने नेमका खून कोणी केला याचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलिसांच्या एका गुप्त बातमीदारामार्फत अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी त्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली.
काय होतं कारण?
मिराबाई यांच्याकडून अल्पवयीन मुलाचा मोबाईल पाटाच्या पाण्यात पडला होता. त्याचा राग त्या मुलाच्या मनात होता. 25 मार्चला मिराबाई त्यांच्या शेतातील काम करुन झोपलेल्या होत्या. त्या झोपेत असताना अल्पवयीन मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने तिथल्याच एका दगडाने महिलेच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या चौकशीतून आता आणखी कुठली माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काही दिवसांपूर्वी, शेतात कामाला गेलेल्या मीरा यांची हत्या करण्यात आली होती. चेहरा दगडाने अत्यंत निघृणपणे ठेचण्यात आला . मीरा यांची हत्या कोणी आणि का केली हे तेव्हा समजू शकलेलं नव्हतं. या घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला होता. या घटनेमुळे अंतरवली टेंभी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.