Viral News: खोदायला गेला अन् शेतकरी कोट्यधीश झाला, शेतात काय सापडलं?
शेतकऱ्याच्या शेतातून 700 हून अधिक सोन्या-चांदीचे सिक्के निघाले आहेत. प्राचिन काळातले हे सिक्के आहेत. आणि या सिक्क्यांची किंमत लाखोंच्या घऱात आहे.त्यामुळे चांगलच शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात. तर काही खूपच आश्चर्यकारक असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत शेतकऱ्याची लॉटरीच लागली आहे. कारण शेतकऱ्याच्या शेतातून 700 हून अधिक सोन्या-चांदीचे सिक्के निघाले आहेत. प्राचिन काळातले हे सिक्के आहेत. आणि या सिक्क्यांची किंमत लाखोंच्या घऱात आहे.त्यामुळे चांगलच शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
एनवायटीच्या रिपोर्टनुसार, एक व्यक्ती त्याच्या शेतात काम करत होता. या दरम्यान शेतात खोदकाम करत असताना शेतकऱ्याला गृहयुद्ध काळातील 700 हून अधिक सोन्या-चांदीचे सिक्के मिळाले आहे. हे सिक्के जमीनीखाली दफन होते. आणि खोदकामा दरम्यान शेतकऱ्याला ते सापडले आहे. 1840-1863 दरम्यानच्या काळातले हे सिक्के आहे. या सिक्यांना न्युमिजमाटीक गॅंरेंटी (NGC)द्वारा प्रमाणित केले गेले आहे.
हे ही वाचा : Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे ‘हे’ व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? पतीसोबत…
युटयूब चॅनेल गोवमिंटने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती जमीनीतून हे सिक्के काढताना दिसत आहे.काही सिक्के 1 डॉलरचे होते. तर काही 10 आणि 20 डॉलरचे होते.यामध्ये काही दुर्मिल लिबर्टी पॅर्टन कॉईन देखील होते. तब्बल 95 टक्के कॉईन सोन्याचे होते.
हे वाचलं का?
लाइव सायन्सने दिलेल्या माहितीनूसार, काही सिक्के खुपच दुर्मिळ होते. या सिक्क्यांवर इन गॉड वी ट्रस्ट असे लिहलेले नाही, जे अमेरिकेचे अधिकृत ब्रीदवाक्य आहे. हे बोधवाक्य 1866 मध्ये गृहयुद्ध संपल्यानंतर सर्व सोने आणि चांदीच्या चलनात जोडले गेले आहे. सध्या या सोन्या-चांदीच्या सिक्क्यांना लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. काही सिक्क्यांची किंमत तर लाखोंच्या घरात आहे. अशी माहिती आहे की, या सिक्क्यांची चमक ही जशीच्या तशी आहे.
ADVERTISEMENT
दुर्मिळ सिक्क्यांचा डील करणाऱ्या जेफ गॅरेटने सांगितले की, ग्रेट केंटकी होर्ड संभाळण्याची संधी माझ्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 700 पेक्षा जास्त सोन्याच्या डॉलर्सचा शोध महत्वपुर्ण असल्याने या शोधाचे महत्व सांगता येणार नाही. हे सिक्के गृहयुद्धा दरम्यानचे आहे.
ADVERTISEMENT
अमेरीकेत ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेय ही घटना समोर येताच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : सोलापूर : दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून 10 लाख कसे उकळले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT